घरदेश-विदेशपाकिस्तान राष्ट्रीय दिनावर भारताने टाकला बहिष्कार

पाकिस्तान राष्ट्रीय दिनावर भारताने टाकला बहिष्कार

Subscribe

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. २३ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात भारत आपला कोणताही प्रतिनिधी पाठवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थीती सुधण्याचे चित्र दिसत नाही. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे आणि या भूमिकेवर भारत अजून टिकून आहे. दरम्यान भारतावर झालेल्या हल्ल्यनंतर दोन देशातील संबध अजून बिघडली आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी शंगटनांचे तळ नष्ट झाले. भारताने पाकिस्तानवर आर्थिक बंहिष्कार टाकला होता. यानंतर आता भारताने याच पाऊलांवर पावले ठेवत पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मार्च रोजी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनास सहभागी होण्यासाठी भारत आपला प्रतिनिधी पाठवणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्ली येथे होणार कार्यक्रम

नवी दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायोग येथे पाकिस्तानी राष्ट्रीय दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ मार्च रोजी होणारा हा कार्यक्रम २२ मार्च रोजी (शुक्रवार) ठेवण्यात आला. या कार्यक्रमासाठी भारतीय प्रतिनिधींना निमंत्रण होते. मात्र पाकिस्तानवर बहिष्कार टाकल्यामुळे भारतीय प्रतिनिधींनी तेथे गेले नाही. १४  फ्रेब्रूवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात  ४० जवान शहीद झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -