घरCORONA UPDATEकोरोनावर उपचार म्हणून ४ आयुर्वेदिक औषधांची चाचणी करणार - आयुष मंत्री

कोरोनावर उपचार म्हणून ४ आयुर्वेदिक औषधांची चाचणी करणार – आयुष मंत्री

Subscribe

कोरोनो विषाणू संसर्गाच्या आजारासाठी भारत चार आयुर्वेदिक औषधांवर काम करत आहे आणि लवकरच चाचण्या केल्या जाणार आहेत.

देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. देशाच्या कोरोनाबाधितांच्या आकडा ७८,००० च्या पार गेला आहे. अशातच कोरोनावर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करण्याची तयारी सुरु आहे. कोरोनो विषाणू संसर्गाच्या आजारासाठी भारत चार आयुर्वेदिक औषधांवर काम करत आहे आणि लवकरच चाचण्या केल्या जाणार आहेत. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली.

श्रीपाद नाईक यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “कोरोना विषाणूवर चार आयुर्वेदिक औषधांना प्रमाणित करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर मिळून काम करत आहेत. एक आठवड्यात त्याची तपासणी केली जाईल. ही औषधे अ‍ॅड-ऑन थेरपी (इतर औषधांसह) म्हणून वापरली जातील.”

- Advertisement -


हेही वाचा – इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गाऊन न घालता केली सुनावणी

- Advertisement -

यापूर्वी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले होते की आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर यांच्या सहकार्याने तीन प्रकारचं संशोधन केलं गेलं आहे. ते म्हणाले, “चार औषधांवरील चाचण्या देशभर सुरू आहेत. आम्ही अत्यंत मोठ्या नमुन्यांच्या आकारावर अभ्यास करत आहोत जे क्वारंटाईनमध्ये आहेत. याचा नमुना आकार ५ लाख आहे. प्रतिकारशक्तीसंदर्भात पंतप्रधानांनी दिलेला आयुष मंत्रालयाच्या औषधांचा सल्ला ५० लाख लोकांवर त्याचा वापर केला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -