घरदेश-विदेशRafale Landing In India : राफेल विमानांच पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून केलं...

Rafale Landing In India : राफेल विमानांच पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून केलं स्वागत!

Subscribe

 

- Advertisement -

 

- Advertisement -

अखेर राफेल विमानांचे भारताच्या अंबाला एअरबेसवर लँडिंग झाले आहे. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या जेटच्या ताफ्याने मंगळवारी रात्री संयुक्त अरब आमिरात (UAE) मध्ये मुक्काम विश्राम घेतला. फ्रान्सहून येणारे भारतात दाखल होत असलेली या विमानांनी बुधवारी दुपारी भारताकडे पुन्हा उड्डाण घेतले.


हे विमान अंबाला एअरबेसवर उतरणार आहे. तिथे त्याचे जंगी स्वागत केले जाईल. परंपरागत वायूसेनेच्या वतीने विमानांना सेल्युट करण्यात येईल. अंबालामध्ये त्याच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

राफेल लढाऊ विमान लवकरच भारताच्या भूमीवर दाखल होणार आहे. राफेल लढाऊ विमानांच्या आगमनाला आता फक्त काही मिनिटे उरली आहेत. राफेल भारताच्या हवाई हद्दीत दाखल झाले असून हरयाणामधील अंबाला बेसवर दुपारी दोन वाजता ही विमाने उतरतील.

वायूसेना प्रमुख अंबाला एअरबेसवर पोहोचले असून राफेलने युएईवरून प्रस्थान केले आहे. साधारण २ ते ३ च्या दरम्यान ते अंबालाला पोहोचणार आहे.

राफेल भारतीय वायू सीमेवर दाखल झाले. युईएवरून प्रस्थान केल्यानंतर अंबालासाठी रवाना झाली आहे. कंट्रोल रूमने या पाच विमानांचे स्वाग केले आणि बेस्ट ऑफ लकही म्हणाले. ‘एएनआय’नं दिलेल्या माहितीनुसार, राफेलच्या तुकडीनं यूएईच्या अल धाफरा एअरबेसहून उड्डाण घेतल्यानंतर पश्चिम अरब सागरात तैनात नौसेनेची युद्धनौका ‘आयएनएस कोलकाता’शी संपर्क स्थापन केला. या दरम्यान राफेलच्या एअरो लीडर आणि आयएनएस कोलकाताने संवाद साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -