घरदेश-विदेशभारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली नासाचा नवीन प्रकल्प

भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली नासाचा नवीन प्रकल्प

Subscribe

अंतराळ वैज्ञानिक अनीता सेनगुप्ता यांनी कोल्ड अॅटम लॅबोरेटरी असलेले स्पेस स्टेशन विकसित करण्यासाठी एका प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. ‘कोल्ड अॅटम लॅबोरेटरी’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. यापूर्वी अनीता सेनगुप्ता यांनी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या अंतराळ अभियांत्रिकीच्या संघाचे नेतृत्व केले होते. हा संघ ‘हाइपरलूप वन’ या प्रकल्पासाठी अजूनही काम करत आहे.

कोण आहेत अनीता?
अनिता सेनगुप्ता या मूळतः भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म स्कॉटलँडमध्ये झाला. यापूर्वीही त्यांनी नासाच्या प्रोजेक्टचे नैतृत्व केले होते. साल २०१२ ते २०१७ पर्यंत मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या यानाच्या प्रकल्पाचे त्यांनी नैतृत्व केले. तसेच त्यांनी मंगळ ग्रहावर उतरण्यासाठी उपयोगी असे सुपरसॉनिक पॅराशूट विकसित केले होते. सध्या त्या हाइपरलूप वन या प्रकल्पात सिस्टम इंजीनियरींगच्या उपाध्यक्षा आहे. थंड वातावरणात प्रयोग करण्यास सोपे व्हावे यासाठी अंतराळ वँक्यूमहून १० अब्ज पट ठंड ठिकाणाच्या निर्मितीमध्ये त्यांनी भाग घेतला.

- Advertisement -

 

- Advertisement -

व्हॅक्यूम ट्यूबच्या वापरावर भर
अंतराळात फिरण्यासाठी कोणतेही वाहन उपयोगी येत नाही. हवेच्या दाबाचा वापर करुनच तेथे प्रवास करता येऊ शकतो. यासाठी व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अनेक लांबचे अंतर हे काही मिनिटात गाढता येते. असाच एक व्हॅक्यूम ट्यूब मंगळावरही बनवण्याचा मानस आहे. या ट्यूबमध्ये असलेल्या ट्रेन मधून अंतराळ वीरांना प्रवास करता येणार आहे. स्पेस एक्स कंपनीचे संस्थापक एलन मस्कयांनी सर्वात प्रथम या ट्यूब्सची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेवर सध्या अनीता या कार्यरत आहेत.

शास्त्रज्ञांच्या टीमचे नैतृत्वाची जवाबदारी
हायपरलूप वन अंतर्गत केलेल्या प्रयोगात व्हॅक्यूम ट्यूबमधील ट्रेनचा वेग ३७८ किमी प्रतितास इतका करण्यात यश मिळाले आहे. हा वेग अजून वाढवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांच्या टीमकडून करण्यात येत आहे. याटीमचे नैतृत्वाची दवाबदारी अनीताच्या खाद्यावर आहे. यापूर्वीही त्यांनी नासाच्या ‘मार्स क्यूरोसिटी रोवर’ या प्रकल्पात सहभाग घेतला होता. हा प्रोजक्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा अनीताचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -