घरताज्या घडामोडीCoronavirus: लष्कारातील जवानाला करोनाची लागण; लष्करातील पहिलीच घटना

Coronavirus: लष्कारातील जवानाला करोनाची लागण; लष्करातील पहिलीच घटना

Subscribe

करोनाची लागण झालेल्या जवानाचे वडील हे इराणमधून परत आले आहेत. त्यांना देखील करोनाची लागण झाली आहे.

देशभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात करोना जलद गतीने फोफावत असताना करोना आता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांपर्यंत पोहचला आहे. लडाखमध्ये लष्करातील एका जवानाची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर या चाचणीत करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. लष्करातील जवानाला करोनाची लागण झाल्याचे हे पहिले प्रकरण आहे.

करोनाची लागण झालेल्या जवानाचे वडील हे इराणमधून परत आले आहेत. त्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. करोनाबाधित जवान २५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत रजेवर गेला होता. त्यानंतर २ मार्चला पुन्हा रुजु झाला, अशी माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – करोना पॉझिटिव्हचा एअरपोर्ट ते कल्याण व्हाया सोलापूर प्रवास, पण ‘त्या’ टॅक्सी ड्रायव्हरलाच आले ५१ कॉल्स


जवानाच्या वडीलांना करोनाची लागण झाल्याचे ६ मार्च रोजी समोर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जवानाला क्वॉरंटाईन करण्यात आले. दरम्यान, १६ मार्च रोजी आलेल्या चाचणी अहवालात करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जवानाच्या बहिणीला, पत्नी आणि दोन मुलांना सोनम नरबु रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -