घरCORONA UPDATEअंगावर फाटका रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट; तरी आपलं कर्तव्य बजावतात

अंगावर फाटका रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट; तरी आपलं कर्तव्य बजावतात

Subscribe

जीव मुठीत घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर मात्र, सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

देशभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहेत. सध्या देशभरात कोरोनाव्हायरसचे १ हजार २५२ रुग्ण आढळून आले आहेत. या कोरोनाग्रस्त रुग्णांवर अनेक डॉक्टर उपचार करत आहेत. आतापर्यंत ३२ रुग्णांचा या व्हायरसने जीव घेतला आहे. त्यामुळे व्हायरसपासून इतर रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर मात्र, आपला जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टरांची परिस्थिती फार गंभीर असल्याचे समोर आले आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी या डॉक्टरांकडे पुरेशा सोयीसुविधा नसल्याने या डॉक्टरांनी आता चक्क डोक्यात हेल्मेट तर अंगावर फाटका पेनकोट घालून हे डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.

- Advertisement -

सध्या डॉक्टरांना कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी एक विशेष प्रकारचा ड्रेस दिला आहे. ज्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. मात्र, आता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी आपल्या सुरक्षेसाठी अंगावर रेनकोट चढवले असून डोक्यावर बाईकचे हेल्मेट चढवले आहे.

- Advertisement -

कोलकात्यातील Beliaghata Infectious Disease Hospital मध्ये कोरोनाव्हायरसच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभावत असणाऱ्या डॉक्टरांना प्लास्टिक रेनकोट देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी हे रेनकोट दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच त्याचा फोटोही समोर आला आहे. यामध्ये डॉक्टारांनी घातलेला रेनकोट फाटलेल्या अवस्थेत आहे.

हरयाणाच्या ईएएसआय (ESI) रुग्णालयातील डॉक्टरांनी

माझ्याकडे N95 मास्क नसल्याने मी कोरोना व्हायरसपासून बचावकरण्यासाठीब बाईकवरील हेल्मेट वापरत आहे. मी पहिल सर्जिकल मास्क लावतो आणि त्यानंतर त्यावर हेल्मेट घालतो. मात्र, त्यामुळे मला नीट दिसत देखील नाही.  – डॉ. संदीप गर्ग; हरयाणाच्या ईएएसआय (ESI) रुग्णालयातील डॉक्टर

डॉक्टर जीव मुठीत धरून रुग्णसेवा देत आहे. प्रत्येक जण कोरोना व्हायरसला घाबरला आहे. सुरक्षेशिवाय कुणालाही काम करायचे नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे.


हेही वाचा – जीवनावश्यक वस्तू वाटपात नगरसेवक आघाडीवरच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -