घरताज्या घडामोडीकरोनाबरोबर लढण्यासाठी लष्कर तयार

करोनाबरोबर लढण्यासाठी लष्कर तयार

Subscribe

देशभरात  करोना संशयितांची वाढती संख्या बघून करोना व्हायरसबरोबर लढण्यासाठी डॉक्टरांबरोबरच लष्करालाही तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर लष्कराच्या रुग्णालयात करोना रुग्णांसाठी विशेष कक्ष उभारण्यात येत आहेत. क्वारनटाईन व्यक्तींसाठीही लष्करातर्फे देशातील विविध राज्यात विशेष कक्ष उभारले जात आहेत. येत्या ४८ ते ७२ तासात हे कक्ष तयार होतील असे लष्कराने सांगितले आहे.

यात प्रमुख्याने जोधपूर, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, कोच्ची, हैदराबाद, बंगळुरू, कानपूर, जैसलमेर, जोरहाट आणि गोरखपूर येथे हे कक्ष उभारण्यात येत आहेत. सध्या देशातील विविध भागात ५० करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी हा आकडा तीनशे पार झाला. त्यानंतर करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या ६,७०० जणांना क्वारनटाईन करण्यात आले. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर देशात सध्या करोनाग्रस्त रुग्णांमध्ये ३२ जण परदेशी नागरिक आहेत. यात १७ जण इटली, ३ फिलीपाईन्स, २ जण इंग्लंड, १ कॅनेडा, १ इंडोनेशिया आणि १  सिंगापूरचा नागरिक आहे. यातील चारजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र संशयित रुग्णांची वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. करोनाच्या महामारीने जगभरात आतापर्यंत १० हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -