घरदेश-विदेशब्रिटनच्या पंतप्रधानच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक आघाडीवर, ही आहेत कारणे

ब्रिटनच्या पंतप्रधानच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक आघाडीवर, ही आहेत कारणे

Subscribe

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान शर्यतीतून माघार घेतल्याने भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. रविवारीच त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. काही महत्त्वाच्या घटनांमुळे ऋषि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवत आहेत.

  • ऋषि सुनक यांना जवळपास १४४ खासदारांचं समर्थन आहे. सुनक यांनी निवडणूक जिंकली तर भारतीय वंशांचे ते पहिले पंतप्रधान ठरतील. पंतप्रधान बनण्यासाठी उमेदवाराला जवळपास १०० खासदारांचं समर्थन लागतं.
  • यानुसार, पीएम पदाचे उमेदवार पेनी मॉर्डेंटपासून सुनक फारच पुढे आहेत. त्यांच्याकडे काहीच खासदारांचं समर्थन आहे. त्यामुळे या शर्यतीत ऋषि सुनकच आघाडीवर आहेत.
  • माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे १०० खासदारांचं समर्थन असल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु, त्यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने ऋषि सुनक यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • आज निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
  • लिझ ट्रस यांनी 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. यामुळे देशात पुन्हा पंतप्रधान निवडण्याची गरज आहे. बोरिस जॉन्सन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. ऋषी सुनक यांच्याकडे त्याहून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -