अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार, लुटण्याचाही प्रयत्न

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरु केली आहे. अज्ञातांविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. साईचरणचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या जबाबाच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गोळीबार करणाऱ्या आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र

शिकागो येथे भारतीय विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेसह भारतातही या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव के साईचरण असे आहे. साईचरण हा तेलंगणा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तो शिक्षणासाठी शिकागो येथे गेला होता. तेथे त्याने अन्य भारतीय मित्रांसोबत मैत्री केली. शिकागो येथील दुकानात साईचरण खरेदीसाठी गेला होता. तेथे खरेदी करत असताना काहीजणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे दुकानात एकच खळबळ उडाली. गोळीबारात साईचरण जखमी झाला आहे. मित्रांनी साईचरणला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरु केली आहे. अज्ञातांविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. साईचरणचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या जबाबाच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

२०१८ मध्ये तेलंगणा येथीलच एका नागरिकाची अमेरिकेत गोळया घालून हत्या करण्यात आली होती.अमेरिकेच्या न्यू जर्सी भागात एका १६ वर्षीय मुलाने हा गोळीबार केला होता. मुळचे तेलंगणाचे असलेले सुनील एडला (वय ६१) यांचा या गोळीबारात मृत्यू झाला. वेटाँर शहराच्या सुनील यांच्या घराबाहेर १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सुनील यांची कार चोरी करताना हा प्रसंग घडला होता. अटलांटिक शहरातील एका हॉटेलमध्ये ते काम करत होते. या घटनेमुळेही एकच खळबळ उडाली होती.

आम्हाला मानसिक धक्का बसला

शिक्षणासाठी साईचरण अमेरिकेत गेला आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त माध्यमातून कळाले. या घटनेमुळे आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आईला दुःख झाले आहे, असे साईचरणचे वडील श्रीनिवास यांनी सांगितले.