घरताज्या घडामोडीIndian Vaccination: देशातील लसीकरणाचा 178.83 कोटींचा टप्पा पार

Indian Vaccination: देशातील लसीकरणाचा 178.83 कोटींचा टप्पा पार

Subscribe

देशातील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. कारण मागील काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. देशातील वेगाने सुरू असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी झाल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मागील आठवड्यात सांगण्यात आले होते. दरम्यान गेल्या 24 तासांत देशात 26.19 लाखांहून अधिक (26,19,778) लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आतापर्यंत लसीकरण व्याप्तीने 178.83 कोटी (1,78,83,79,249) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आतापर्यंत भारत सरकारने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 179.61 कोटींहून अधिक (1,79,61,13,730)  मात्रांचा (विनामूल्य) आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे पुरवठा केला आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या 15.54 कोटींहून अधिक (15,54,66,546) मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असून लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

- Advertisement -

गेल्या 24 तासांत 9,754 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,23,88,475. झाली आहे. परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.66% इतका आहे. गेल्या 24 तासात 5,476 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 59,442 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.14% आहे. देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 9,09,985 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.28 कोटींपेक्षा जास्त (77,28,24,246) चाचण्या केल्या आहेत.

- Advertisement -

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.77% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 0.60%. नोंदविण्यात आला आहे.


हेही वाचा – Weather Update: ‘या’ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -