Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश कोरोनाचा 'डबल अटॅक'! एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग!

कोरोनाचा ‘डबल अटॅक’! एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग!

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना कहर गेल्या दीड वर्षभरापासून सुरू असून कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा फैलाव देखील सुरू असून या व्हेरिएंटने देखील अनेक जण बाधित झाले आहेत. नुकतीच आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोना व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) चे प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र (RMRC) चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बी बोरकाकोटी यांनी ही माहिती दिली.

भारतातील पहिलीच घटना

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांना कोरोना व्हेरिएंटच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळले. आरएमआरसीच्या प्रयोगशाळेत मे महिन्यात रुग्णांवर कोरोनाचा डबल अॅटक झाल्याचे आढळले होते. डॉ. बोरकाकोटी यांनी असे सांगितले की, ब्रिटन, ब्राझील आणि पोर्तुगाल येथे देखील दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याची काही रूग्णांची नोंद केली गेली होती, परंतु भारतातील ही पहिलीच घटना असून यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नसल्याचे सांगितले जात आहे.

असे आहे लक्षण

- Advertisement -

या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एक महिनाानंतर तिला आणि तिच्या पतीला कोरोना व्हायरसच्या अल्फा व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाला. हे दोघेही डॉक्टर आहेत आणि कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना दरम्यान त्यांनी अनेकांना सेवा दिली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांनी सांगितले की ‘आम्ही या जोडप्याचे नमुने गोळा केले आणि चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात महिला डॉक्टरला दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले.’ त्यांनी पुढे असेही सांगितले की, या महिला डॉक्टरला घसा खवखवणे, शरीरास वेदना होणं आणि झोप न येण्यासारखी लक्षणं तिला जाणवत होती. मात्र तिला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही.


पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला

 

- Advertisement -