Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Covid-19: ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत तेजस एक्सप्रेस महिन्याभरासाठी रद्द

Covid-19: ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत तेजस एक्सप्रेस महिन्याभरासाठी रद्द

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तर अनेक जिल्ह्यांमध्ये कडक कोरोना निर्बंध लादण्यात आले. असे असतानाही राज्यात अद्यापही कोरोना रुग्णवाढीचा वेग  कमी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचे संकेत दिले जात असतानाच रेल्वे प्रशासनाने आता अहमदाबाद-मुंबईदरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस १ महिन्यासाठी रद्द केली आहे. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे आईआरसीटीसीतर्फे चालवण्यात येणारी 82902/82901 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आजपासून (२ एप्रिल) पुढील १ महिना बंद राहणार आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रसह गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात तब्बल ४३ हजार १८३ नव्या रुग्णांची नोंद झाली तर गुजरातमध्ये काल २४१० नवे रुग्ण आढळून आले. यात अहमदाबादमध्ये काल ६२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून कडक निर्बंध असतानाही रुग्णसंख्या आटोक्य़ात आणण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रयत्न करावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवासातून संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी उपाय म्हणून मुंबई- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आजपासून (२ एप्रिल) पुढील १ महिना बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.


 

- Advertisement -