Mumbai Corona Update: खासगी रुग्णालयांचे बेड्स कमी पडू लागल्याची महापौरांची कबुली

मुंबईच्या महापौर

मुंबईत काल (गुरुवार) कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. याच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाचा बोजा वाढला आहे. त्यासाठी मुंबईत कडक निर्बंध करावे लागतील,’ अशा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. यावेळी महापौरांनी कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे खासगी रुग्णालयांचे बेड्स कमी पडू लागल्याचे मान्य केले.

हेही वाचा – covid-19 रूग्णांना थेट बेड दिले जाणार नाहीत, प्रभाग वॉररूममधूनच रूग्णालयातील बेड्सचे नियोजन

‘सुरुवातीपासून सर्व मुंबईकर कोरोना नियमांचे चांगले पालन करत आले आहेत. पहिल्यांदा cc1 आणि cc2 हे दोन्ही सुरू केले होते, ते मध्यंतरी काळात बंद करण्यात आले. पण आता मानवी बळाचा वापर करून सुरू केलेले आहे. पूर्वी १४ ते १५ हजार बेड्स होते. पण आता २५ हजार बेड्सची व्यवस्था आहे. यामध्ये आयसीयू, ओटू बेड्स, ए सिमटिमॅट्किस आणि सिमटिमॅक्टिक्स बेड्स आहेत. पण आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे खासगी रुग्णालयांचे बेड्स कमी पडत आहेत,’ असे महापौर म्हणाल्या.

‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरात राहिल्यामुळे दोन समस्या निर्माण होतात. एकतर त्यांच्या घरचे बाधित होतात, नंतर त्याचा आरोप डॉक्टर किंवा हॉस्पिटलवर केला जातो. त्यामुळे उद्या माझा आजार वाढला तर मीच जबाबदार अशी परिस्थिती झाली आहे. मात्र तरीदेखील लक्षणं दिसल्यास त्वरित रुग्णालयात दाखल व्हा, असं महापौरांनी आवाहन करत म्हणाल्या की, कोरोना प्रादुर्भाव वाढत असला तरी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.


हेही वाचा – Lockdown: पालकमंत्रीच म्हणतात, मुंबईत आणखी किती कडक नियम लावायचे?