घरताज्या घडामोडीभाजपच्या बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ल्याचा कट; रशियात अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्याकडून खुलासा

भाजपच्या बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ल्याचा कट; रशियात अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्याकडून खुलासा

Subscribe

भारतावर मोठ्या आत्मघातकी हल्ल्याच्या कटाचा पदार्फाश रशियातून अटक केलेल्या आयसिसच्या दहशतवाद्याने केला आहे. भारतात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या एका बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र हा कट उधळण्यात आला आहे. रशियातून इसिसच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. रशियातील सरकारी एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसने या दहशतवाद्याला पडकल्याची माहिती दिली आहे.

फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने हा दहशतवादी मध्य आशियातील एका देशातील नागरिक असल्याचे सांगितले आहे. त्याने भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. पण योग्य वेळी एफएसबीने त्या दहशतवाद्याला ताब्यात घेतले. यासंदर्भातील माहिती रिक्युरिटी सर्व्हिसने दिली आहे.

- Advertisement -

एफएसबीच्या माहितीनुसार, तो एप्रिल ते जून या कालावधीत तुर्कीमध्ये होता आणि त्याने तेथे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. त्याला प्रथम रशियाला पाठवण्यात आले आणि तेथून भारतात पाठवण्याची तयारी करण्यात आली. भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या (भाजप) नेत्याला मारण्यासाठी दहशतवाद्याने स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती, असे रशियन सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे. त्याला ISच्या एका उच्चपदस्थ नेत्याने ‘आत्मघाती बॉम्बर’ म्हणून तुर्कीतील त्याच्या संघटनेत भरती केले होते.

रशियन सुरक्षा एजन्सीने या दहशतवाद्याचे नाव अद्याप उघड केलेले नाही. ‘टेलीग्राम’ या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तो या जागतिक दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. ISमध्ये सामील झाल्यानंतर त्याने दहशतवादी संघटनेशी निष्ठा व्यक्त केली होती.त्यानंतर IS ने त्याला आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्याला मॉस्कोहून भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच भाजपच्या एका बड्या नेत्याला टार्गेट करण्याची जबाबदारी ISने त्याच्यावर सोपवली होती.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा! १८ महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरच मिळणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -