धक्कादायक! ‘या’ देशाला शाळा सुरू करणं पडलं महागात; ६८०० जणांना केलं क्वारंटाइन!

Dharavi Corona Hotspot
कोरोनामुळं चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील हसूच गायब झालंय.

कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. पण आता काही देशांनी बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. अशा देशांमध्ये लॉकडाऊनचे नियमही शिथील करण्यात आले आहेत. काही देशांमध्ये शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. पण हा असा निर्णय घेणं देशाला चांगलच महागात पडलं आहे. या देश म्हणजे इज्राइल. शाळा सुरू होताच पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मुलं आणि शाळेचे कर्मचारी मिळून एकूण २६१ जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे ६८०० मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

इज्रायलच्या शाळेतील २६१  जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६१  कोरोना संक्रमितांमध्ये २५०  मुलं आहेत. यानंतर ६८००  जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १७,३७७ वर पोहोचली आहे.

शाळा बंद

इज्राईलमध्ये शाळेमध्ये कोरोनाचे प्रकरण वाढल्यामुळे इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत शाळेतील मुलं आणि कर्मचारी पूर्णपणे कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. कोरोनाव्हायरस देशांच्या यादीत इज्राइल ४२  व्या स्थानावर आहे. आतापर्यंत १४,९९३ कोरोना रुग्ण बरे झालेत. तर २१४५ सक्रिय रुग्ण आहेत,  ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


हे ही वाचा – खुशखबर! सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे भाव!