घरदेश-विदेशभारतातील शत्रूंवर अंतराळातून नजर; ISRO लाँच करणार नवं सॅटेलाईट

भारतातील शत्रूंवर अंतराळातून नजर; ISRO लाँच करणार नवं सॅटेलाईट

Subscribe

हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी लाँच होणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ७ नोव्हेंबर रोजी आपला पहिला उपग्रह लाँच करणार आहे. कोरोनामुळे इस्रोचे अनेक प्रकल्प रखडले होते, जे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा सुरू केले गेले आहे. इस्रो PSLV-C49 रॉकेटसह उपग्रह ‘EOS-01’ (अर्थ ऑब्जरवेशन रिसेट उपग्रह) लाँच करणार आहे. हे मिशनदेखील विशेष असल्याचे सांगितले जात आहे, PSLV-C49 सह लिथुआनियामध्ये एक, लक्झमबर्गमध्ये चार आणि अमेरिकेत चार असे एकूण ९ उपग्रह इस्त्रो लाँच करणार आहेत, हे सर्व उपग्रह न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) च्या व्यावसायिक कराराखाली लाँच करण्यात येत आहेत.

भारताच्या ‘EOS-01’ विषयी बोलायचे झाले तर हा उपग्रह एक अर्थ ऑब्जरवेशन रिसेट उपग्रह आहे. या प्रगत व्हर्जनमध्ये सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) आहे ज्यामध्ये कोणत्याही वेळी आणि हवामानात पृथ्वीवर नजर ठेवण्याची क्षमता आहे. यासह असेही सांगितले जात आहे की, हा उपग्रह भारतीय सैन्याला त्याच्या सीमा शोधण्यात मदत करणार आहे. याशिवाय शेती आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाची मदत होऊ शकते.

- Advertisement -

हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी लाँच होणार आहे. या मोहिमेनंतर, इस्रोने डिसेंबरमध्ये GSAT-12R कम्युनिकेशन उपग्रह लाँच करण्याची योजना आखली आहे. तसेच PSLV-C50 रॉकेटद्वारे लाँच करण्याची योजना देखील आखली जात आहे. इस्रोने डिसेंबर २०१९ मध्ये आपलं शेवटचं उपग्रह लाँच केलं होतं. इस्रोने ११ डिसेंबर २०१९ रोजी रिसॅट-2BR1 रॉकेट PSLV-C48 लाँच केले होते. हा उपग्रह अंतराळात नजर ठेवणारा होता. तसेच यावर्षी जानेवारीत, Gsat-30 फ्रेंच गुयानाच्या युरोपियन स्पेसपोर्ट येथून सुरू करण्यात आले होते.


अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -