Earthquake in Rajasthan : राजस्थानच्या जयपूरमध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

jaipur earthquake in rajasthan jaipur magnitude three point eight on the reactor scale
Earthquake in Rajasthan : राजस्थानच्या जयपूरमध्ये भूंकपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

राजस्थानच्या जयपूरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जयपूरपासून राजस्थानच्या उत्तर -पश्चिमेला 92 किमी अंतरावर 3.8 तीव्रतेचा हा भूंकप झाला आहे. नॅशनल फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज सकाळी(18 फेब्रुवारी 2022) साडे आठच्या सुमारास या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी होती. भूकंपाच्या घटनेवर निरीक्षण ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या जयपूरच्या वायव्येस 92 किमी आणि 5 किमी खोल होता. भूकंपामुळे आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेल्याची वृत्त नाही.

गेल्या वर्षभरात देशात 965 छोट्या-मोठ्या भूकंपाच्या घटना

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी इतर अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत, मात्र त्याची तीव्रता कमी असल्याने कुठेही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत देशात एकूण 965 छोट्या-मोठ्या भूकंपांची नोंद झाली आहे. मात्र या सर्व भूकंपांची तीव्रता कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

उत्तराखंडमध्येही झाला भूकंप

12 फेब्रुवारीला सकाळी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. उत्तरकाशीपासून ३९ किमी पूर्वेला टिहरी गढवाल परिसरात पहाटे 5.03 वाजता भूकंप झाल्याची माहिती आहे. मात्र, भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे भूकंप झाल्याची माहिती आहे. मात्र, हा भूकंप फार तीव्रतेचा नव्हता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप पहाटे 3.02 च्या सुमारास झाला आणि भूकंप जम्मू-काश्मीरमधील कटरापासून 84 किमी पूर्वेला 3.5 रिश्टर स्केलचा होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

यातच 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 वाजता जम्मू काश्मीरमध्ये तीव्र भूकंपाचे झटके जाणवले होते. याची तीव्रता या दोन भूकंपाच्या घटनांपेक्षा अधिक होती. रिश्टर स्केलवरत या भूकंपाची तीव्रता 5.7 नोंदवली गेली होती.