घरताज्या घडामोडीहडबीची शेंडी दुर्घटनेची पर्यटन संचालनालयाकडून दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्स गटाला देणार नोटीस

हडबीची शेंडी दुर्घटनेची पर्यटन संचालनालयाकडून दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्स गटाला देणार नोटीस

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून चार किमी वर असलेल्या हडबीची शेंडी या डोंगरावरून उतरताना दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या अपघातामध्ये एक जण जखमी झाल्याचे सुद्धा समजले होते. अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या आयोजित उपक्रमात सहभागी झाले होते. या दुर्घटनेची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने (DOT) दखल घेतली आहे. पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, साहसी पर्यटन धोरणाच्या अंतर्गत साहसी उपक्रम राबविणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणे अनिवार्य करण्यात आले आहे, यासाठी राज्यातील सर्व संस्थांना ऑगस्ट 2021 पासून हा अर्ज भरण्यासाठी 6 महिने कालावधी देखील देण्यात आला होता. मात्र ‘इंद्रप्रस्थ ट्रेकर्स’नी अद्यापही आपल्या गटाची नोंदणी केलेली नाही परिणामी घडलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर पर्यटन संचालनालयाकडून इंद्रप्रस्थ ट्रेकर्स गटाला नोटीस बजावण्यात येणार आहे.

पर्यटन संचालनालयाचे सह संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी या प्रसंगाविषयी खेद व्यक्त करत, महाराष्ट्रातील साहसी उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना कठोर शब्दात इशारा दिला आहे, “आमच्या साहस प्रेमी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी साहसी पर्यटन धोरण राबवण्यात आले आहे, ज्यानुसार जमीन, हवा आणि पाण्यातील सुमारे 25 साहसी उपक्रम राबवणाऱ्या सर्व संस्थांसाठी नोंदणी अनिवार्य आहे,  मात्र मुदतीचा कालावधी संपत आली असतानाही काही साहसी संस्था/गटांनी आपली प्राथमिक नोंदणी केली नसेल, तर अशा संस्था धारकांवर कारवाई करण्यात येईल.” अशा शब्दात सावळकर यांनी विनापरवाना साहसी उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना इशारा दिला.

- Advertisement -

हडबीची शेंडी हा मनमाड जवळ एक अंगठ्याच्या आकाराचा 120 फूट उंच सुळका आहे याला अंगठ्याचा डोंगर असेही म्हणतात. हडबीच्या शेंडीवर झालेला अपघात नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला हे विशेष चौकशी पथकामार्फत तपासण्यात येईल व आयोजकांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.


हेही वाचा : Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरला आठवला निवृत्तीचा क्षण, कोहलीच्या इमोशनल गिफ्टचा सांगितला किस्सा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -