घरदेश-विदेशजालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पूर्ण; राहूल गांधी यांची शहीदांना श्रध्दांजली

जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पूर्ण; राहूल गांधी यांची शहीदांना श्रध्दांजली

Subscribe

१३ एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पुर्ण झाली आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी अमृतसरमध्ये जाऊन शहिदांना श्रध्दांजली वाहिली.

आज १३ एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्ताने हत्याकांडातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यसाठी विविध कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा अमृतसमध्ये काल रात्रीच दाखल झाले होते. सकाळी साडेआठ वाजता राहूल यांनी शहीदांना श्रध्दांजली वाहिली. त्याचबरोबर उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रात्री अमृतसमध्ये आल्या येथील सुवर्ण मंदिराला दिली भेट दिली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित होते. शुक्रवारी रात्री जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यपाल व्ही.पी. सिंह बदनौर, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कॅन्डल मार्च काढला.

- Advertisement -
Rahul gandhi
राहूल गांधी

शहिदांची आठवणीत नवीन नाणं

जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्ष पुर्ण होत आहेत. या निमित्ताने शहिदांची आठवण म्हणून नवीन नाणं जारी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

काय आहे जालियनवाला हत्याकांड

अमृतसरमध्ये १३ एप्रिल १९१९ला जालियनवाला बागेत एका सभेत मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. या काळात ब्रिटीशांनी शहरात जमावबंदी लागू केली होती. यावेळी शहरात लष्करी कायदा सुरू होता. तरीही लोक सभेसाठी जालियनवाला बागेत एकत्र जमले होते. त्या सभेच्यादिवशी बैसाखीचा सण होता. त्यावेळी जनरल डायर या निर्दयी ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -