घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये हिमवृष्टी; गर्भवती महिलेसाठी लष्कराचा मदतीचा हात

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये हिमवृष्टी; गर्भवती महिलेसाठी लष्कराचा मदतीचा हात

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवृष्टीमुळे अनेक सुविधांना ब्रेक लागला असल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवृष्टीमुळे अनेक सुविधांना ब्रेक लागला असल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. अशातच लष्कराच्या जवानांनी आपत्कालीन वैद्यकीय बचाव मोहीम राबवून गर्भवती महिलेला रुग्णालयात नेले. तेथे महिलेने एका मुलीला जन्म दिला. (Jammu Kashmir Amidst Snowfall Kupwara Army Extended A Helping Hand Sent Pregnant Woman)

“प्राथमिक आरोग्य केंद्र कालरूस येथून आपत्कालीन माहिती मिळाली. यामध्ये गर्भवती महिलेला वेदना, रक्त कमी होणे आणि हृदयाचे ठोके वाढल्याने तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची विनंती करण्यात आली”, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

या भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्त्यावरून जाणे अशक्य झाले. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. परिणामी त्यावेळेची गंभीरता आणि महिलेची प्रकृती खालवते हे लक्षात घेत लष्कराने २.५ टन (विशेष वाहन) मध्ये वैद्यकीय आणि बचाव पथक पाठवले.

कोणत्याही हलक्या वाहनाला तेथून जाणे अवघड झाले होते. बचाव पथकाने महिलेला काळजीपूर्वक वाहनात ठेवले. त्यानंतर जोरदार हिमवृष्टीमध्ये तिला कुपवाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. लष्कराने केलेल्या या तातडीच्या मदतीमुळे गर्भवती महिलेचे प्राण वाचले.

- Advertisement -

लडाखमध्ये हिमवृष्टी, सिंगेला खिंडीतून नवजात बालकांसह चौघांची सुटका

लडाखमधील लेह आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा झालेल्या हिमवृष्टीने संपूर्ण राज्य गारठले. लेह जिल्ह्यातील सिंगेला पास येथे हिमवृष्टीदरम्यान कारमधून जात असलेल्या एका कुटुंबातील नवजात बालकासह चार जण अडकले. याबाबत माहिती मिळताच बीआरओ आणि पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.

कारने हे लोक खलसे येथून लेह जिल्ह्यातील नेरककडे जात होते. सिंगेला खिंडीत हिमवृष्टीमुळे त्यांचे वाहन अडकले. आजूबाजूला लोकवस्तीचा परिसर नव्हता. माहिती मिळताच कनिष्ठ अभियंता प्रदीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली बीआरओच्या 114 आरसीसीकडे पथक रवाना करण्यात आले. पोलिसांकडूनही सहकार्य घेण्यात आले. पथकाने चौघांचीही सुटका करून त्यांना फोटोक्सर गावात नेले.


हेही वाचा – ‘ही’ खेळाडू संघाबाहेर; भारतीय क्रिकेट संघाला ‘पाक’विरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -