घररायगडजप्तीच्या कारवाईनंतरही भंगारची विक्री; कारवाईसाठी पोलीसांना निवेदन

जप्तीच्या कारवाईनंतरही भंगारची विक्री; कारवाईसाठी पोलीसांना निवेदन

Subscribe

खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ऐबीजी क्रेन (तस्कर) कंपनी २०१४ सालापासून बंद पडली असतानाही कंपनीने गेल्या काही वर्षाची ग्रामपंचायतीची घरपट्टी (कर) थकीत ठेवल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. या कंपनीने घरपट्टी थकीत ठेवून परस्पर कंपनीतील भंगार विक्री काढून ग्रामपंचायतीची दिशाभूल करित असल्याने याबाबत ग्रामस्थांनी अनेकांना ग्रामपंचायत प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला असल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीला वेळोवेळी नोटीस काढून ही कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे.

खोपोली : खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ऐबीजी क्रेन (तस्कर) कंपनी २०१४ सालापासून बंद पडली असतानाही कंपनीने गेल्या काही वर्षाची ग्रामपंचायतीची घरपट्टी (कर) थकीत ठेवल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. या कंपनीने घरपट्टी थकीत ठेवून परस्पर कंपनीतील भंगार विक्री काढून ग्रामपंचायतीची दिशाभूल करित असल्याने याबाबत ग्रामस्थांनी अनेकांना ग्रामपंचायत प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला असल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीला वेळोवेळी नोटीस काढून ही कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. असे असताना याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कंपनी प्रशासनावर काTEAMरवाई व्हावी अशी मागणी केली असता पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी कंपनीवर जप्ती नोटीस काढली. त्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने या नोटीशीला केराची टोपली दाखवत भंगार विक्री सुरूच ठेवल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ७ फेब्रुवारी रोजी खालापूर पोलीस ठाण्याला निवेदन देत या कंपनीवर कडक कारवाई मागणी केली आहे. याप्रसंगी सरपंच शैलेश मोरे, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.
तर ग्रामपंचायतीचा कर थकीत ठेऊन परस्पर भंगार विक्री करणार्‍या कंपनीवर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले असून ग्रामस्थ वर्ग कारवाईच्या निर्णयावर ठाम असून कारवाई होऊ पर्यंत गप्प बसणार नाही असा निश्चय केल्याचे पाहायला मिळत आहे. शिरवली ग्रामपंचायतीचे कर थकीत ठेवणार्‍या कंपनीवर पंचायत समिती प्रशासनाने जप्तीची नोटीस काढली असतानाही कंपनी प्रशासन ग्रामपंचायतीची दिशाभूल करित परस्पर भंगार विक्री करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत ७ फेब्रुवारी रोजी खालापूर पोलीस ठाण्याला निवेदन देत परस्पर भंगार विक्री करणार्‍या कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.
ऐबीजी क्रेन कंपनीने ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत ठेवला असताना कंपनी प्रशासन परस्पर भंगार विक्री करित असल्याने ग्रामपंचायतीला कर मिळावा यासाठी आम्ही ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करीत तसेच माहिती दिली असताना पंचायत समितीच्या माध्यमातून कंपनीला जप्तीची नोटीस काढूनही कंपनी प्रशासन पुन्हा परस्पर भंगार विक्री करित असल्याने कंपनीवर कारवाईसाठी जिल्हा परिषद सिओ यांच्याकडे दाद मागणार आहोत, तर जो पर्यंत कंपनीवर कडक कारवाई होत नाही तो पर्यत आम्ही गप्प बसणार नाही.
– महेश पाटील,
ग्रामस्थ, शिरवली

ऐबीजी क्रेन कंपनीने ग्रामपंचायतीचा कर थकीत ठेवल्याने ग्रामपंचायती मार्फत कंपनीला नोटीस पाठवली असताना कंपनी प्रशासनाने कर भरण्याचे आश्वासन दिले होते, परंतू कंपनी प्रशासन कर भरण्यास चाल ढकल असल्याने अखेर कंपनीवर कारवाई व्हावी यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच कर जमा व्हावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्व प्रयत्न करित आहेत.
– शैलेश मोरे
सरपंच, शिरवली

- Advertisement -

ग्रामपंचायतीने ऐ.बी.जी.क्रेनला या पूर्वी ही वेळोवेळी नोटीस पाठवली असून लाखो रुपयांचा कर थकीत ठेवणार्‍या कंपनीवर कारवाईसाठी खालापूर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन दिले आहे.
प्रल्हाद पाटील,
ग्रामसेवक, शिरवली ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -