घरताज्या घडामोडीशोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार; ४ दिवसांत १२ जणांचा खात्मा

शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार; ४ दिवसांत १२ जणांचा खात्मा

Subscribe

जम्मू - काश्मीरमधील शोपियानच्या सुधो हेधाम भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

जम्मू – काश्मीरमधील शोपियानच्या सुधो हेधाम भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या भागात दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरु आहे. या आठवड्यात शोपियानमधील चकमकीची ही तिसरी घटना असून यापूर्वी रविवारी पाच आणि सोमवारी चार दहशतवादी ठार झाले होते. त्यामुळे चार दिवसांत १२ जणांचा खात्मा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ४४ आरआर आणि लष्कराच्या सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी सुगो हेधामा येथे शोध मोहीम राबविली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार सुरू केला.

- Advertisement -

४ दिवसांत १२ जणांचा खात्मा

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; सुरक्षा दलाला शोपियानच्या सुगो हेधामा भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. शोधमोहीमे दरम्यान, झालेल्या चकमकीत पहाटे २ दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. त्यानंतर या भागात लपूर बसलेला आणखी एक दहशतवादी टिपण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.


हेही वाचा – देशभरात २४ तासांत ९ हजार ९८५ नवे रुग्ण; २७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -