घरCORONA UPDATEजावेद अख्तर यांनी मोदींच्या भाषणावर केली टीका आणि ट्विटरवर झाले ट्रोल

जावेद अख्तर यांनी मोदींच्या भाषणावर केली टीका आणि ट्विटरवर झाले ट्रोल

Subscribe

पंतप्रधान मोदी यांच्या या वाक्यावरून जावेद अख्तर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये लाखो मजुरांच्या त्रासाबद्दल एकही शब्द बोलले नाही.

गीतकार जावेद अख्तर यांनी पंतप्रधानांच्या संबोधनावर प्रतिक्रिया दिल्यानंतर ट्रोल झाले आहेत. एक दिवस आधी पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करतेवेळी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित केले होते. याशिवाय, लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली असता लॉकडाऊन चौथा हा नव्या नियमावलीनुसार असेल. पंतप्रधान मोदी यांच्या या वाक्यावरून जावेद अख्तर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये लाखो मजुरांच्या त्रासाबद्दल एकही शब्द बोलले नाही. ही चांगली गोष्ट नाही. या वक्तव्यानंतर जावेद हे ट्विटरवर ट्रोल झाले.

जावेद अख्तर यांचे ट्विट

‘२० लाख कोटी रुपयांचे पॅकेज हे देशाचे मनोबल वाढवण्यासाठी आहे. परंतु, ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये लाखो प्रवासी मजुरांच्या त्रासावर एक शब्द ही बोलले नाही. ज्यांना जिवंत राहण्यासाठी तात्काळ मदतीची गरज आहे. ही चांगली गोष्ट नाही.’ जावेद यांच्या ट्विटवर माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू म्हणाले की, राजीव गांधी म्हणायचे की, सरकारी योजनांमधील एक रुपयातला एक पैसा हा गरजवंतापर्यंत पोहोचतो. म्हणजेच २ लाख कोटी रुपये हे लोकांपर्यंत पोहोचतील.

- Advertisement -

 

- Advertisement -

या ट्विटनंतर ट्रॉलर्स जावेद अख्तर यांच्यावर तुटून पडले. एक नेटकऱ्याने लिहिले की, चाचा ओ अपने हिसाब से बोलते है, तुम्हारे हिसाब से नहीं। वो टाईम २०१४ मे चला गया, जब पीएम तुम्हारे हिसाब से बोलते थे। सच को स्वीकार करो और आगे बढो। तसेच अजित पांडे हा नेटकरी म्हणाला की, ज्यांचे योगदान देश आणि गरिबांमध्ये शून्य आहे. ते ट्विटरवर जास्तच ज्ञान देतात. पाकिस्तानची एवढी जीडीपी नाही. त्यापेक्षाही भारत जास्त आर्थिक मदत करत आहे.

मनोज अग्रवाल म्हणतो की, जावेद साहेब, कोणती गोष्ट कधी करायची हे आपल्यापेक्षा मोदी चांगल्या प्रकारे जाणतात. प्रवासी मजुरांबाबत काय केले पाहिजे यावर राज्यांच्या मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांच्या हिशेबाने राज्य सरकार कामाला लागली आहे. ज्या आर्थिक पॅकेज ही घोषणा करण्यात आली आहे, ते गरीब मजुरांच्या मदतीसाठी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -