घरताज्या घडामोडीपांढऱ्या केसांवर घरगुती उपाय जाणून घ्या

पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय जाणून घ्या

Subscribe

पांढरे केस असतील तर नक्की हा घरगुती उपाय करा.

आपले केस दाट, मुलायम, काळे भोर असावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. धूळ, प्रदूषण, चुकीचा आहार यामुळे देखील लोकांचे केस पांढरे होत आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच पांढऱ्या केसांची समस्या होऊ लागली आहे. थायरॉईड, अॅनिमिया, प्रोट्रीनची कमतरता, कमी हिमोग्लोबिन आणि अनुवंशिक आजारांमुळे देखील कमी वयात कसे पांढरे होत आहेत. पांढरे केसांपासून सुटका मिळण्यासाठी लोक केमिकल युक्त हेअर प्रोडक्टसचा वापर करतात आणि त्यामुळे केसांचे अजूनच नुकसान होते. त्यामुळे आज आपण पांढऱ्या केसासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहे. बटाट्याचा हेअर पॅक…

बटाट्याच्या सालात लोह आणि पोटॅशियमचे प्रमाण तसेच तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते. तसेच बटाट्याच्या सालातील स्टार्च देखील केसांसाठी खूप फायदेशीर असते. बटाट्याच्या सालात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, आणि व्हिटॅमिन-सीसारखे अनेक पोषक तत्व असतात. बटाट्यातील स्टार्च हे नॅचरल हेअर कलर देखील मानले जाते. हे केसांना काळे करण्यास मदत करते. तसेच यामुळे पांढरे केस कमी होतात आणि केस अधिक मुलायम आणि चमकदार देखील होतात.

- Advertisement -

असा तयार करा बटाट्याचा हेअर पॅक

हेअर पॅक तयार करण्यासाठी बटाट्याची साले, लव्हेंडर तेल, काळे तीळ किंवा तीळाचे तेल, लवंग आणि कापूर घ्या. पहिल्यांदा तीन-चार बटाट्यांची साले घ्या आणि थंड पाण्यात धुवा. त्यानंतर एका भांड्यात गरम करा आणि त्यात बटाट्याची साले टाका. मग चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर थंड आचेवर पाच ते १० मिनिटे ठेवा. जेव्हा पाणी थोडे जाड होईल तेव्हा गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये ओता. मग त्यात बारीक केलेला कापूर आणि लवंग टाका. त्यानंतर लव्हेंडर तेल आणि काळे तीळ किंवा तेल टाका.

याचा वापर तुम्ही केस शॅम्पू करून झाल्यानंतर करा. या हेअर पॅकेला ओले केस असतानाच लावा. दोन्ही हातांनी आपल्या केसांच्या मुळापर्यंत लावा आणि पाच मिनिटे मसाज करा. मग एक तास तसेच ठेवा. त्यानंतर पुन्हा केस धुवा. काही महिने हे केल्यानंतर तुमचे केस काळे आणि मुलायम होतील.

- Advertisement -

हेही वाचा – पुन्हा पुन्हा पाणी उकळून पिऊ नका नाहीतर…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -