घरदेश-विदेशJEE Advanced चा निकाल जाहीर, आयआयटी मुंबईचा आर.के. शिशिर देशात प्रथम

JEE Advanced चा निकाल जाहीर, आयआयटी मुंबईचा आर.के. शिशिर देशात प्रथम

Subscribe

पार्थ भारद्वाज या परीक्षेत प्रथम आला असून या परीक्षेद्वारे २३ आयआयटीच्या १६ हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबई – JEE Advancedचा निकाल आज जाहीर झाला आहे. jeeadv.ac.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी आपल्या परीक्षेचा निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्म दिनांक आणि फोन नंबर प्रविष्ट करून निकाल पाहू शकतील. २८ ऑगस्ट रोजी JEE Advanced परिक्षा झाली होती. त्यानंतर १५ दिवसांच्या आत निकाल हाती आला आहे.

हेही वाचा – १७ कोटींची रक्कम, १६ तास मोजणी आणि ८ काऊन्टिंग मशीन्स, आमीर खान यांच्या घरात सापडलं घबाड

- Advertisement -

JEE Advanced निकाल डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना JEE Advancedच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. jeeadv.ac.in हे अधिकृत संकेतस्थळ असून होम पेजवर JEE Advanced २०२२ रिझल्ट लिंकवर क्लिक करा. येथे सांगितलेली माहिती प्रविष्ट केल्यास तुम्हाला तुमचा रिझल्ट प्राप्त होईल. तसंच, या रिझल्टची हार्ड कॉपीही प्रिंट करून घ्या, जेणेकरून पुढे त्याचा उपयोग होऊ शकतो.

JEE Advanced पेपर १ आणि २ मध्ये मिळून १५५५३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४०७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६५१६ मुली आहेत. आयआयटी मुंबईतील आर.के.शिशिर हा देशात प्रथम आला असून त्याने ३६० पैकी ३१४ गुण मिळवले आहेत. तर, मुलींमध्ये आयआयटी दिल्लीची तनिष्का काब्रा प्रथम आली असून तिला ३६० पैकी २७७ गुण मिळाले आहेत. तर ती देशात १६ वी ठरली आहे.

- Advertisement -

यावर्षी १२४ शहरांमध्ये ५७७ केंद्रांवर जीईई अॅडवान्स परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेद्वारे २३ आयआयटीच्या १६ हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. एकूण ३६० गुणांच्या या परीक्षेत पेपर-१. पेपर-२, दोन्ही १८०-१८० गुणांचे होते. गेल्यावर्षी ४१ हजार ८६२ विद्यार्थी समुपदेशनासाठी पात्र ठरले होते.

हेही वाचा – १० च्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -