Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, 48 आमदारांचा पाठिंबा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, 48 आमदारांचा पाठिंबा

Subscribe

रांची – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांना 48 आमदारांचा पाठिंबा मिळाला. हा आकडा बहुमतापेक्षा जास्त आहे. मतदानादरम्यान भाजप आमदारांनी सभात्याग केला.

विश्वासदर्शक ठरावासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. 6 दिवसांनंतर, महाआघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या २९ आमदारांना अधिवेशनासाठी रविवारी रायपूरहून रांचीत आणण्यात आले. राज्यातील काँग्रेसचे 3 आमदार घोटाळ्यात अडकल्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. डॉ इरफान अंसारी, नमन विक्सल कोंगाड़ी आणि राजेश कच्छप अशी या आमदारांची नावे आहेत. उच्च न्यायालयाने त्यांना कोलकाता सोडण्याची परवानगी दिलेली नाही.
त्यामुळेच विश्वासदर्शक ठराव –
सोरेन म्हणाले, ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत, तेथे ते (भाजप) लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच विश्वासदर्शक ठराव मिळणे आवश्यक मानले जात होते. सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

विधानसभेतील पक्षीय संख्या –
एकून आमदार – 81
बहुमत – 42
झामुमो – 30
काँग्रेस – 15
अन्य – 3
- Advertisement -

भाजपा – 26

आजसू – 2

- Advertisement -

अपक्ष – 2

सोरेन यांना 48 आमदारांचा पाठिंबा –

विधानसभेत सीएम सोरेन यांना अपेक्षेप्रमाणे पाठिंबा मिळाला. 81 सदस्यांच्या झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 48 मते पडली. बहुमताच्या बाबतीत त्यांच्या सरकारला कोणताही धोका नव्हता. त्यांना त्यांच्या पक्षाच्या झामुमो चे 30, कॉंग्रेसचे 15 (रोख घोटाळ्यात सहभागी असलेले तीन आमदार वगळता), RJD, CPI(ML) आणि NCP चे प्रत्येकी एका आमदारांचा पाठिंबा आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -