घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव; पशुपालकांसमोर संकट

जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव; पशुपालकांसमोर संकट

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जनावरांमध्ये विषाणूजन्य लम्बी या त्वचारोगाचा प्रादूर्भाव सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात ८५० जनावरांना या रोगाची लागण झाली असून १० जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या रोगाचा सर्वाधिक प्रसार नगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यात झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे जनजागृती व उपाययोजना केल्या जात आहेत. जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत औषधोपचार करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

पशुपालकांनी लम्पी स्किन या जनावरांमधील आजारामुळे घाबरून जाऊ नये. रोगसदृश लक्षणे दिसून आल्यास त्वरित जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा. पशुवैद्यकाकडून उपचार करुन घ्यावेत, तसेच रोगप्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. ग्रामपंचायत स्वरावरून पशुपालकांमध्ये लम्पी आजाराबाबत प्रबोधन करावे. आवश्यक ती खबरदारी योग्यवेळी घेतल्यास संक्रमणाची शक्यता राहणार नाही. : लीना बनसोड, सीईओ, जिल्हा परिषद, नाशिक

रोगप्रसाराची कारणे

  • बाधित जनावरांच्या नाकातील स्राव, लाळ, मूत्र, दूध, विर्यातून जनावरांना होतो
  • रोग पसरविणारे किटक, डास, चावणार्‍या माशा व गोचिड
  • उष्ण व दमट वातावरणात लम्बी रोगाचा जास्त प्रसार होतो
  • दुषित चारा व पाणी सेवन तसेच वासरांना बाधित गायीकडून संसर्ग
  • ४ ते १४ दिवसांपर्यंत संक्रमण कालावधी
  • लम्पी रोगाचे विषाणु रक्तामध्ये आढळतात व नंतर शरीरात इतर भागात संक्रमण करतात

लम्पी रोगाची लक्षणे

  • जनावरांना ताप येतो व त्यामुळे दूध उत्पादन कमी होते
  • संक्रमित झालेल्या जनावरांच्या नाकात व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळतात
  • जनावरांना पोट, पाठ, पाय, मान, डोके, शेपटीखाली त्वचेवर १० ते ५० मी.मी. व्यासापर्यंतच्या कडक व गोलाकार गाठी येतात
  • डोळ्यांतून व नाकातून स्राव होतो गर्भधारणा अवस्थेतील जनावरामध्ये गर्भपात होतो किंवा रोगट वासरे जन्माला येतात
  • काही जनावरांत पायावर सुज येवून लंगडतात

रोगावरील उपचार

  • गोळ्यांत डास, माश्या, गोचिड होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • जनाबरोबर उपचार करतांना नविन सिरोंज निडलचा वापर करावा
  • साथीचा आजार सुरु असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी
  • बाधित जनावरे त्वरित वेगळे करावेत
  • गोठ्यात सोडियम हायपोक्लोराईड किंवा फिनेलची फवारणी करावी
  • जनावरांना आयव्हरमेक्टीन इंजेक्शन दिल्यास किटक, गोचिड नियंत्रण होते

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -