घरदेश-विदेशJNU : कॅम्पस परिसरातून दोन विद्यार्थिनींना पळवून नेण्याचा प्रयत्न, संघटना आक्रमक

JNU : कॅम्पस परिसरातून दोन विद्यार्थिनींना पळवून नेण्याचा प्रयत्न, संघटना आक्रमक

Subscribe

दिल्ली : मुंबईतील एका वसतिगृहात 19 वर्षीय मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच जेएनयू (Jawaharlal Nehru University) कॅम्पस परिसरातून मंगळवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थिनींना कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जेएनयूचे कुलगुरू (JNU VC) आणि सुरक्षा प्रभारी यांच्याकडेही तक्रार नोंदवण्यात आली आहे. यातील आरोपींची ओळख पटली असून ते जेएनयूचे विद्यार्थी नसल्याची माहिती पोलसांनी दिली.

- Advertisement -

जेएनयू विद्यार्थी संघटना (JNUSU) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यावतीने देखील जेएनयू प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये कॅम्पसच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

हेही वाचा – चर्चगेट वसतीगृह प्रकरण.. तरुणीची बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या वॉचमनची आत्महत्या

- Advertisement -

अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे एकच्या सुमारास दोन विद्यार्थिनी कॅम्पस परिसरातील रस्त्यावरून चालल्या होत्या. त्यावेळी हरियाणाची नंबर प्लेट असलेली एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार तिथे आली आणि त्या कारमधील तीन मुलांनी दोन्ही विद्यार्थिनींना ओढत गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलींचे अपहरण करण्यात आरोपींना यश आले नाही आणि ते पळून गेले. कॅम्पसमध्ये सुरक्षेत हलगर्जीपणा असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

या प्रकरणी दोन पीडित मुलींपैकी एकीने आपली वैद्यकीय चाचणी केली आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली असल्याचे जेएनयू विद्यार्थी संघटनेने सांगितले. याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. दिल्ली पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे.

हेही वाचा – New Drishyam : छत्तीसगडमधील बेपत्ता अँकरचा मृतदेह नव्या रस्त्याखाली दफन?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -