घरदेश-विदेशआसाराम बापूला दणका, पॅरोल अर्ज फेटाळला

आसाराम बापूला दणका, पॅरोल अर्ज फेटाळला

Subscribe

२० दिवसांच्या पॅरोलसाठी आसाराम बापूनं केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. बलात्कारच्या आरोपाखाली आसाराम सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

आसाराम बापूला जोधपूर न्यायालयानं दणका दिला आहे. बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूनं २० दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला होता. पण जोधपूर जिल्हा न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळं पॅरोलवर २० दिवस जेलबाहेर येण्याच्या आसारामच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं आहे. २०१३ साली आसाराम बापुनं १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यानंतर जोधपूर न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण, आता आसाराम बापूनं पॅरोलसाठी केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

आसारामची दुष्कर्म

साबरमतीच्या नदी किनारी आसारामनं छोट्या आश्रमापासून सुरूवात केली. बघता – बघता देशभरात आसारामचे लाखो भक्त झाले. त्यातून करोडीची माया देखील आसारामनं गोळा केली. देशभरात आसारामचे ४०० आश्रम असून १० हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. दरम्यान, २०१३ साली आसारामवर १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप करण्यात आला. अखेर या प्रकरणामध्ये न्यायालयानं आसारामला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर आसारामनं २० दिवसांच्या पॅरोलसाठी जोधपूर न्यायालयामध्ये अर्ज केला. पण न्यायालयानं तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे आसारामची दिवाळी ही तुरूंगातच होणार आहे. आसारामचं हे सारं प्रकरण बाहेर आल्यानंतर सारा देश हादरून गेला होता. त्याच्यामुलावर देखील बलात्कार आणि खुनाचे आरोप आहेत. शिवाय आसारामच्या आश्रमात नेमकं काय चालायचं? याची देखील चौकशी सध्या केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -