घरदेश-विदेशJoe Biden : काबुल सोडण्याच्या बायडन यांच्या निर्णयाचा अमेरिकन जनतेकडून विरोध

Joe Biden : काबुल सोडण्याच्या बायडन यांच्या निर्णयाचा अमेरिकन जनतेकडून विरोध

Subscribe

अफगाणिस्तानातून अमेरिकनं सैन्याने माघार घेताच तालिबान्यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्यात. मात्र अफगाणमधून सत्ता मागे घेण्याच्या ज्यो बायडन यांच्या परराष्ट्र नितीवरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागतेय. यातच अमेरिकनं जनतेने बायडेन यांची अप्रुव्हल रेटिंग देखील कमी केली आहे. एनपीआर आणि पीबीएस न्यूशोअरसह एका नव्या मॅरिस्ट नॅशनल पोलनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची अप्रुव्हल रेटिंग ४३ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्य़ानंतरची बायडन यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी निच्चांकी रेटिंग आहे. यात बहुतांश अमेरिकन नागरिकांनी बायडन यांच्या परराष्ट्र नितीला विरोध केला आहे. याशिवाय अमेरिकनं जनतेने अफगाणिस्तानात संयुक्त राज्यांची भूमिका निष्फाळ ठरल्याचे मत नोंदवले आहे.

५६ टक्के अमेरिकन जनता बायडन यांच्या परराष्ट्र नितीविरोधात

नव्या पोलनुसार, जवळपास ५६ टक्के अमेरिकन नागरिकांनी ज्यो बायडन यांच्य़ा परराष्ट्र निती पद्धतीला विरोध दर्शवला आहे. याशिवाय मॅरिस्ट पोलनुसार प्रकाशित डेटामध्ये अमेरिकेच्या ६१ टक्के नागरिकांनी अमेरिकन सैन्य माघार घेण्याच्या निर्णयाला नकार दिला आहे. यामुळे अफगाणिस्तानात वास्तविक या व्हायला हवं होतं याबाबत अमेरिकन जनता संभ्रामात असल्याचे पोलमधून स्पष्ट झाले. यात ७१ टक्के अमेरिकन जनतेला अफगाणिस्तानात अमेरिका सपशेल अपयशी ठरल्याचे म्हटलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे सध्या परिस्थितीत अमेरिकेची प्रतिष्ठा खूप खालवल्याचे मत अमेरिकन जनतेने म्हटलं आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानाबद्दलची ज्यो बायडन यांची निती रिपब्लिकन पक्षाला देखील आवडली नाही. पोलनुसार, ७३ रिपब्लिकन्सनं बायडन यांच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आहेत. तर ६६ टक्के डेमोक्रॅट देखील बायडन यांच्या परराष्ट्र नितीवर नाराज आहेत.


afghanistan crisis : तालिबान विरोधकांना आश्रय दिलात तर… अफगाणी नेत्याची भारताला धमकी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -