घरक्रीडालॉकडाऊनमध्ये हार्दिक पांड्याचं गाणं होतंय तुफान व्हायरल; बघा व्हिडीओ

लॉकडाऊनमध्ये हार्दिक पांड्याचं गाणं होतंय तुफान व्हायरल; बघा व्हिडीओ

Subscribe

हार्दिक पांड्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की #पांड्या ब्रदर्स कराओके टाईम, लॉकडाऊन स्पेशल...

कोरोना विषाणूमुळे, सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आयपीएल २०२० देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, क्रिकेटपटू घरी आपल्या कुटुंबियांसह वेळ घालवत आहेत. क्रिकेटपटू घरी असण्याव्यतिरिक्त आपल्या चाहत्यांसाठीही काहीतरी नवीन आणि वेगळं करत असल्याचे सध्या सोशल मीडियावर बघायला मिळतंय. रविवारी आपल्या चाहत्यांना भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याचे वेगळंच रूप बघायला मिळाले. यावेळी हार्दिक पांड्या आपला भाऊ क्रृणाल पांड्या सोबत गाणं गाताना दिसला.

- Advertisement -

रविवारी हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हार्दिकने आपला भाऊ क्रृणाल याच्यासोबत लॉकडाऊनमध्ये खास गाणं देखील गायले आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटातील तेरी मिट्टी हे गाणं दोन्ही भाऊ एकत्र गाताना दिसताय. हार्दिक पांड्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की #पांड्या ब्रदर्स कराओके टाईम, लॉकडाऊन स्पेशल… या व्हिडीओवर हार्दिक पंड्याची होणारी पत्नी नताशा स्टॅनकोविकने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नताशाने यावर अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ओये होए’ असे लिहिले आहे. तसेच या प्रतिक्रियेसह तिने ह्रदयाच्या आकाराचे इमोजीही पाठवले आहे., यासह पांड्याच्या चाहत्यांना देखील त्याचा हा अंदाज आवडला असून त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करताना दिसताय.


CoronaVirus: भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये करणार श्रीलंका दौरा पण…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -