घरताज्या घडामोडीKerala : दोन दिवसांपासून खोल दरीत अडकलेल्या मुलाची अखेर सुटका; 'या' अवलियाचं...

Kerala : दोन दिवसांपासून खोल दरीत अडकलेल्या मुलाची अखेर सुटका; ‘या’ अवलियाचं धाडस अंगलट

Subscribe

केरळ मधील पलक्कडमध्ये डोंगराळ भागात दोन दिवसांपासून एक तरुण अडकला होता. या तरुणाला वाचवण्यात लष्कराला यश मिळालं आहे. सोमवारी 6 फेब्रुवारीपासून पलक्कड भागातील मलमपुझा डोंगरावर गेल्या दोन दिवसापासून अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र या मुलाला वाचवण्यासाठी लष्कराला खूप मोठ्या अडचणी समोर येत होत्या. अखेर अथक प्रयत्नांनंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तरुणाला वाचवण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मलमपुझा भागातील डोंगरात अडकलेला तरुण 20 वर्षाचा असून, त्याला त्याचं नाव आर बाबू असं आहे. तरुण खोल डोंगरात अडकल्याची माहिती मिळताच बचाव टीम त्याला वाचवण्यासाठी गेली.मात्र तेव्हा हा आर बाबू खूप विचित्र अवस्थेत दरीत अडकला होता. दोन दिवसांपासून बाबूने एका छोट्याशा खड्ड्यात आपला जीव मुठीत धरुन बसला होता. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आर बाबू आपल्या दोन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र डोंगर खूप उंच असल्यामुळे दोघांनी तिथून माघार घेतली , पण आर बाबू मागे हटला नाही. तो डोंगर चढतच राहिला. अचानक डोंगराच्या एका भागातून त्याचा पाय अचानक घसरला आणि तो दरीत कोसळला. मात्र या आर बाबूचे नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला.

- Advertisement -

हा आर बाबू डोंगरात अडकला असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. ज्यात हा मुलगा अतिशय कठीण परिस्थितीत एका खड्ड्यात अडकलेला दिसत आहे. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज सकाळी ट्विट् करुन सांगितले की, या आर बाबूशी बोलण्यासाठी लष्कराच्या बचाव पथकाला यश आले आहे. त्यानंतर या बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नानंतर तरुणाला वाचवले.

हे ही वाचा – शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे अमरावतीच्या मनपा आयुक्तांवर शाईफेक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -