घरदेश-विदेशकेरळच्या मुन्नारमध्ये भूस्खलन! ८० मजूर अडकले; ७ मृतदेह बाहेर काढले

केरळच्या मुन्नारमध्ये भूस्खलन! ८० मजूर अडकले; ७ मृतदेह बाहेर काढले

Subscribe

भूस्खलन झालेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

केरळच्या मुन्नारमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर भूस्खलन झाले आहे. टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (टीजीबी) चे सहाय्यक कन्नान दिवाण हिल्स प्लांटेशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (केडीएचपी) चे ८० हून अधिक चहाच्या बागेत काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आज सकाळपासून बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

राजमालाई येथील नेमकक्कड इस्टेटच्या पेटीमुडी विभागात २० कुटुंबांच्या घरावर एक मोठी टेकडी कोसळली. कुटुंबातील सदस्य चिखल आणि दलदलीत अडकले आहेत. एनडीआरएफसह राज्य सरकार बचाव दल अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. जोरदार आणि दरड कोसळल्यामुळे बचाव दलाला पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १० जणांना वाचविण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून मुन्नार डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडत आहे. केडीएचपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के मॅथ्यू अब्राहम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दोन दिवसांपासून या भागात वीजपुरवठा होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई दलाकडून चॉपरची मागणी केली आहे, जेणेकरुन रेक्स्यू ऑपरेशन करण्यास मदत होईल. यासह, ५० लोकांचे पथक बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले आहे, ज्यांना भूस्खलनासारख्या आपत्तीच्या वेळी मदत आणि बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी भूस्खलन झालं तिथे चहाच्या बागेत काम करणारे मजूर राहात असल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात मजुरांची मोठी वस्ती होती. भूस्खलनानंतर एका क्षणात सर्व घरं जमीनदोस्त झाली. यापैकी बहुतेक मजूर तमिळनाडूचे असल्याचंही सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -