घरदेश-विदेशशबरीमाला मंदिराची ८०० वर्षांची परंपरा मोडता मोडता राहिली

शबरीमाला मंदिराची ८०० वर्षांची परंपरा मोडता मोडता राहिली

Subscribe

शबरीमाला मंदिरामध्ये अखेर महिलांना प्रवेश दिलाच नाही. महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा असे आदेश कोर्टाने दिले होते तरी देखील मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला नाही. शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात आला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी शबरीमाला मंदिर ५ दिवसाच्या मासिक पुजेसाठी उघडण्यात आले होते. या मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पुजारी आणि आंदोलकांच्या विरोध आणि धमक्यामुळे त्यांना परत जावे लागले. मंदिरात महिला प्रवेशामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ६ दिवसानंतर आज रात्री ११ वाजता मंदिर एका महिन्यासाठी बंदे कले जाणार आहे. या ६ दिवासाच्या कालावधीत महिलांना प्रवेश देण्यात आला नाही.

पुनर्विचार याचिकेवर उद्या सुनावणी

शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात येणार आहे. न्यायालयाने २८ सप्टेंबरला शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना कोणताही भेदभाव न करता प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही १७ ऑक्टोबरला मंदिर मासिक पुजेसाठी उघडण्यात आले होते.

- Advertisement -

८०० वर्षापासून सुरु आहे परंपरा

शबरीमाला मंदिरामध्ये भगवान अयप्पाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. असे मानले जाते की, भगवान अयप्पा हे ब्रम्हचारी होते. असामध्ये तिथे मासिक पाळी येणाऱ्या म्हणजे १० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेशाला बंदी आहे. ही परंपरा गेल्या ८०० वर्षापासून जपली जात आहे.

दरवर्षी ५ कोटी लोकं घेतात दर्शन

शबरीमाला मंदिर पत्तनमतिट्टा जिल्हाच्या पेरियार टाइगर येथे आहे. १२ व्या शतकामध्ये मंदिरामध्ये भगवान अयप्पाची पुजा केली जात होती. असे मानले जाते की, भगवान अयप्पा, शिव आणि विष्णूच्या स्त्री रुप अवतार मोहिनीचे पुत्र आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी दरवर्षी पाच कोटी लोकं येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -