घरCORONA UPDATECorona: केरळने असा थांबवला कोरोनाचा संसर्ग; आरोग्य मंत्र्यांची योजना यशस्वी

Corona: केरळने असा थांबवला कोरोनाचा संसर्ग; आरोग्य मंत्र्यांची योजना यशस्वी

Subscribe

देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केरळमध्ये मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कमी झालेली पाहायला मिळत आहे. देशात सर्वात पहिला कोरोना रुग्ण हा केरळमध्ये ३० जानेवारी रोजी आढळून आला होता. मात्र आतापर्यंत तेथे ६०२ कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून ४९७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठीच्या केरळ पॅटर्नची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. केंद्र शासित प्रदेश आणि उत्तर पूर्व राज्यांव्यतिरिक्त आज ३.४ कोटी इतकी लोकसंख्या असलेल्या केरळपेक्षा कमी कोरोना रुग्ण असलेल्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आहेत.

हेही वाचा – अजब…! तरुणीचा मृतदेह समजून नातेवाईकांना दिला तरुणाचा मृतदेह

- Advertisement -

तीन वर्षात तीन महामारीचा सामना 

केरळ पॅटर्न बनवण्यामागे तेथील आरोग्य मंत्री शैलजा यांचे मोठे योगदान आहे. एकेकाळी प्रायमरी शाळेच्या शिक्षिका असलेल्या शैलजा यांना आजही टीचर म्हणून संबोधले जाते. त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री शैलजा यांनी गेल्या तीन वर्षात तीन मोठ्या महामारी आजाराचा सामना केला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये आलेले निपाह विषाणू आणि २०१९ ला आलेले इबोला याविरोधात लढण्याचा त्यांचा अनुभव कोविड-१९ साठी उपयोगी पडला आहे.

या उपाययोजना केल्या

केरळमध्ये पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला होता. मात्र आरोग्य मंत्री शैलजा यांनी त्याच्या १० दिवसाआधीच इंटरनेटवर चीनमधील वुहानमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाची माहिती घेतली होती. त्यांनी डॉक्टर, तज्ज्ञांना विचारले की कोरोनी केरळमध्येही येऊ शकतो की, त्यांना हो असे उत्तर मिळाले. त्यानंतर शैलजा यांनी वुहानमधील आरोग्य यंत्रणेबाबतची सर्व माहिती घेतली. त्यानुसार केरळमध्ये उपाययोजना करण्यास सुरूवात केली. त्यांनी २३ जानेवारी रोजी आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली. २४ तारखेला राज्य मुख्यालयात कोविड-९ टास्क फोर्सची नियुक्ती केली. तसेच राज्यातील सर्व १४ जिल्ह्यांच्या मुख्यालयातही टास्क फोर्सचे केंद्र बनवण्याचे आदेश दिले. पुढील दोन दिवसात शहर तसेच गावांमधील सर्व हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रुग्णांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यास सांगितले. तिथे मास्क, हँड ग्लोअज, सॅनिटायझर, पीपीई किटसारख्या आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या. मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -