घरताज्या घडामोडीकेरळात कोरोनाग्रस्तांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि डायबिटीक रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक

केरळात कोरोनाग्रस्तांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि डायबिटीक रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक

Subscribe

एकीकडे देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र असतानाच केरळमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे.

एकीकडे देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र असतानाच केरळमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यातही कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, मधुमेही आणि लशीचे दोन डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक रुग्णांना डेल्टाची लागण झाली आहे. त्यातच केरळमध्ये आता ओणमची लगबग असल्याने या काळात रुग्णसंख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे. यामुळे राज्य सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्र आणि केरळमध्ये झाला होता. पण सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा दर कमी होत आहे. तर केरळमध्ये मात्र कोरोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात जेवढ्या कोरोनाबाधितांच्या नोंदी झाल्या आहेत त्यातील ५१ टक्के केसेस या एकट्या केरळमधल्या आहेत.

- Advertisement -

यामुळे या रुग्णवाढीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी केंद्राने नुकतेच सहा जणांचे एक पथक केरळमध्ये पाठवले होते. या पथकाने केरळमधील नऊ जिल्ह्यांची पाहणी केली. यावेळी या सर्व जिल्ह्याची कोरोनास्थिती ही भयावह असून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या पथकाने केंद्र व राज्य सरकारला कळवले आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये कोरोना संसर्गाचा वेगही अधिक आहे. केरळमध्ये १०० कोरोनाग्रस्तांकडून ११२ लोकांना संसर्ग पसरत आहे.  असे या पथकाने केंद्राला पाठवलेल्या अहवालात म्हटल आहे. यासाठी केरळने सुरू केलेली पर्यटनस्थळ, ओणमसाठी बाजारात झालेली गर्दी हे कोरोना वाढण्याचे मूळ कारण असल्याचं नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलसचे डायरेक्टर डॉक्टर सुजीत कुमार सिंग यांनी म्हटले आहे. या पथकाने पाहणीनंतर केरळमध्ये कोरोना वाढण्याची कारणे केंद्राला पाठवली आहेत.

ही आहेत केरळमध्ये कोरोना वाढण्याची कारणे

- Advertisement -

केरळ सरकारने केंद्राने कोरोनासाठी आखून दिलेल्या अटी व शर्थींचे पालन केलेलं नाही.

रुग्णसंख्या वाढल्यानंतरही येथे कटेंनमेंट झोनसाठी आखून दिलेल्या गाईडलाईन पाळण्यात आलेल्या नाहीत.

यामुळे नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिनधास्त ये जा करत आहेत. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये बफर झोन केलेले नाहीत

केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

पण केरळने सातच दिवस कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई केली होती.

केरळातील ५५ टक्के लोकसंख्या ही संशयित रुग्ण आहेत.

केरळात सध्या डेल्टा व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. ९० टक्क्यापैंकी ८८ टक्के रुग्णांना डेल्टाची लागण झालेली आहे.

इतर कोरोना व्हेरिंयटपेक्षा डेल्टाचा संसर्ग वेग अधिक आहे.

केरळमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दोन लसी घेतलेल्यांनाही कोरोना होत आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण त्या तुलनेत केरळात मात्र रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण अधिक आहे.

केरळात १४, ९७४ केसेस या दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेल्या आहेत. तर लशीचे दोन डोस घेतलेल्या ५,०४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच दुसरा डोस घेतल्यानंतर किती दिवसांनी नागरिकांना कोरोना झाला , त्यांची प्रकृती खालावली आहे की स्थिर आहे यासंबंधीची अपडेट  देण्याच्या सूचना केंद्राने केरळ सरकारला दिल्या आहेत.

केरळमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्याही अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांबरोबरच सहव्याधी असलेल्यांना अधिक असणे हे देखील केरळमधील रुग्णवाढीचे एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.

केरळमध्ये डायबिटीस असलेल्या नागरिकांचे प्रमाण ३० टक्के आहे. या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही असतो. हे देखील केरळमधील रुग्णवाढीचे एक कारण आहे.

केरळमध्ये ८० टक्के रुग्ण हे गृह विलिगीकरणात आहेत. योग्य काळजी न घेतल्यास गृह विलगीकरणातील रुग्णांमुळे कुटुंबातील इतरांनाही कोरोनाचा संसर्गाचा धोका होऊ शकतो. असे डाटामध्ये सांगण्यात आले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -