घरट्रेंडिंग'Chutia ही शिवी नसून एक समाज आहे', नोकरीचा अर्ज नाकारल्यानंतर आसामी महिलेची...

‘Chutia ही शिवी नसून एक समाज आहे’, नोकरीचा अर्ज नाकारल्यानंतर आसामी महिलेची पोस्ट

Subscribe

मुबंई, महाराष्ट्र किंवा भारतातील हिंदी पट्ट्यात लोकांच्या बोलण्यात एका शब्दाचा सर्रास वापर केला जातो. काहीजण त्याला शिवी म्हणतात, तर काही लोक त्याला जोड शब्द म्हणून वापरतात. काही लोक मित्रांना हाक मारण्यासाठी या शब्दाचा वापर करतात. मात्र या शब्दामुळे आसाममधील एका तरुणीला मनस्ताप सहन करावा लागत आहे. आसाममधील Priyanka Chutia नामक मुलीचा नोकरीचा अर्ज तिच्या आडनावामुळे नाकारण्यात आला. राष्ट्रीय बियाणे मंडळासाठी (National Seed Corporation Limited (NSCL) साठी ऑनलाईन अर्ज भरत असताना तिच्या आडनावामुळे वेबसाईटच्या सॉफ्टवेअरने तिचा अर्ज स्विकारला नाही. त्यानंतर वैतागलेल्या प्रियांकाने फेसबुक पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली.

आसामच्या गोगामूख शहरातल्या प्रियांका शेतीमध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयात पदवी संपादन केलेली आहे. त्यानंतर तिने सीड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आडनावात Chutia हा शब्द असल्यामुळे NSCL वेबसाईटचे सॉफ्टवेअर तिचा अर्ज स्वीकारत नव्हते. सॉफ्टवेअरकडून वारंवार उचित शब्द टाकावा, हा एरर दाखविण्यात येत होता. प्रियांका म्हणाली की, “मी आता लोकांना समजावून समजावून थकली आहे. Chutia ही आमच्याकडे शिवी नसून तो एक समाज आहे”

- Advertisement -
priyanka chutia fb post
प्रियांका सुतियाची पोस्ट

सॉफ्टवेअरने प्रियांकाचा अर्ज नाकारल्यानंतर तिने NSCL च्या वेबसाईटला सविस्तर ईमेल लिहून तिची बाजू मांडली. त्यानंतर एका दिवसानंतर तिचा अर्ज स्वीकारण्यात आला. मात्र काही इतर अडचणींमुळे तिला NSCLसाठी काम करता आले नाही. यानंतर NSCL नेही आपली बाजू मांडली आहे. सॉफ्टवेअरचे कोडिंग आपोआप काही शब्द फिल्टर करत असते. त्यामुळे प्रियांका हिचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. मात्र नंतर आम्ही ती चूक सुधारून तिचा अर्ज घेतला.

प्रियांकाच्या पोस्टनुसार आसाममध्ये Chutia नावाचा समाज आहे. ज्याचा उच्चार सुतिया असा होतो. सध्या आसामच्या अनेक भागात हा सुतिया समाज विखुरलेला आहे. सुतिया समाजाने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकेकाळी राज्य केले होते, असा इतिहास येथे सांगितला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -