घरCORONA UPDATEवृद्धाचं नाव चुकून कोरोना यादीत गेलं आणि...

वृद्धाचं नाव चुकून कोरोना यादीत गेलं आणि…

Subscribe

आठ रूग्णवाहिका त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आठ सदस्यांना क्वारंटाइन करण्यासाठी पाठवण्यात आला.  त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरु झाला.

या कोरोनाच्या काळात सगळेच धास्तावले आहेत. त्यामुळे एखादा साधा शिंकला किंवा खोकला तरी तरी भिती वाटते. मात्र उत्तर प्रदेशातील अमरोहमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. एका वृध्द व्यक्तीला सर्दी झाली होती आणि त्याचा घसाही खराब झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आला. पण पुढे जो प्रकार घडला त्याने संपुर्ण कुटुंब धास्तावलं.

देशात कोरोनाची साथ, त्यात घरातील वृद्ध व्यक्तीला सर्दी आणि ताप आल्यामुळे मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळ त्यांना सह एप्रिलपर्यंत रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले. या वृध्दाचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी अलीगड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. त्याच लॅबमध्ये कोरोना व्हायरसची चाचणी केली जाते. सोमवारी या वृद्धाचा रिपोर्टही आला.

- Advertisement -

पण इथेच गडबड झाली, कारण त्या वृध्द व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. . मोरादाबादमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिपोर्टच्या आधारावर त्या वृद्धाला करोनाची लागण झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितले. आता कोरोना झाला म्हटल्यावर एकच धावपळ सुरू झाली. लगेचच आठ रूग्णवाहिका त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आठ सदस्यांना क्वारंटाइन करण्यासाठी पाठवण्यात आला.  त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरु झाला.

कुटुंबातील सर्व आठ सदस्यांचे नमुने घेण्यात आले पण त्या सर्वांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्या वृद्ध व्यक्तीचे नाव चुकून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या यादीत टाकण्यात आले होते. अलीगड प्रयोगशाळेने रिपोर्टची छपाई करताना चूक केल्यामुळे त्या व्यक्तीला करोना पॉझिटिव्ह ठरवण्यात आले होते. त्या ज्येष्ठ नागरिकाला अखेर बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘काहे दिया परदेस’ मधील ती लाडकी जोडी अडकली लग्नबंधनात?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -