घरमनोरंजन'रामायण','महाभारत'च्या यशानंतर बच्चेकंपनीसाठी दूरदर्शनवर येणार 'छोटा भीम'!

‘रामायण’,’महाभारत’च्या यशानंतर बच्चेकंपनीसाठी दूरदर्शनवर येणार ‘छोटा भीम’!

Subscribe

डीडी नॅशनल चॅनलवर 'छोटा भीम' या कार्टुनचे प्रसारण सुरू झाले असून त्याची वेळ दररोज दुपारी २ वाजेपासून असणार आहे. ३ मे पर्यंत असणारा लॉकडाऊन संपेपर्यंत छोटा भीम कार्टुनचे दूरदर्शनवर प्रसारण

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी प्रेक्षकांच्या मागणीनुसार दूरदर्शनवरील नव्वदीच्या दशकातील जुन्या मालिका दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत. त्यापैकी विशेष ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळतेय. लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रेक्षक आवर्जून बघत असून या चॅनलने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड देखील ब्रेक केले आहे. मात्र चॅनलची लोकप्रियता बघता बच्चेकंपनीसाठी देखील खुशखबर आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा प्रसारित करण्यात आलेले छोटा भीम हे कार्टून देखील दूरदर्शनवर दाखवले जाणार आहे. डीडी नॅशनलच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

‘छोटा भीम’ दररोज दुपारी होणार प्रसारित

छोटा भीम बच्चेकंपनीमध्ये खूप लोकप्रिय आहे. वॉर्नर मीडियाची मालकी असणाऱ्या लहान मुलांच्या पोगो या चॅनलसोबत पार्टनरशिप करून छोटा भीम दूरदर्शनवर प्रसारित केले जाणार आहे. डीडी नॅशनल चॅनलवर ‘छोटा भीम’ या कार्टुनचे प्रसारण सुरू झाले असून त्याची वेळ दररोज दुपारी २ वाजेपासून असणार आहे. ३ मे पर्यंत असणारा लॉकडाऊन संपेपर्यंत छोटा भीम कार्टुनचे दूरदर्शनवर प्रसारण केले जाणार आहे.

- Advertisement -

जुन्या गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण

त्यामुळे दूरदर्शनवर आता ‘महाभारत’च्या भीम सोबत बच्चेकंपनीला ‘छोटा भीम’ देखील बघता येणार आहे. लाईव्ह मिंटने दिलेल्या माहितीनुसार, पोगोवर दाखवले जाणारे छोटा भीम हे कार्टुन २००८ साली प्रसारित करण्यात आले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर दूरदर्शनने आपल्या जुन्या गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमध्ये ‘रामायण’ सर्वांत जास्त पसंती मिळत असणारी मालिका आहे तर याशिवाय ‘महाभारत’, ‘चाणक्‍य’, ‘देख भाई देख’, ‘शक्तिमान’, ‘बुनियाद’ सारख्या मालिकांची दूरदर्शनवर पुन्हा एन्ट्री झाली आहे.


सीतेचे अपहरण बघून भावूक झाला रामायणातील ‘रावण’; पहा व्हिडीओ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -