घरदेश-विदेशकर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! शिफ्टनंतर १५ मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास मिळणार ओव्हरटाईन

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! शिफ्टनंतर १५ मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास मिळणार ओव्हरटाईन

Subscribe

खऱ्या अर्थाने आता कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. कारण येत्या काही महिन्यांत देशात कामगार कायद्यांत मोठे बदल होणार आहेत. लवकरचं हा नवा कायदा देशभरात लागू केला जाईल. नवे नियम लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार, कामाची वेळ, भत्ता आणि पीएफ रकमेत मोठे बदल होणार आहे.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणारा ओव्हरटाईम, आणि इन हँड सॅलरीत बदल होणार आहे. सर्वाधिक बदल हा ओव्हरटाईमध्ये होईल. जर कर्मचाऱ्यांनी शिफ्टनंतर १५ मिनिटे जरी अधिक काम केल्यास हा टाईम ३० मिनिटे ठरवतं ओव्हरटाईम म्हणून मोजला जाईल अशी तरतूद नव्या नियमांमध्ये आहे.

- Advertisement -

सध्याच्या नियमानुसार शिफ्टनंतर ३० मिनिटांपर्यंत अधिक काम केल्यास ओव्हरटाईम मिळत नाही. परंतु नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांनी १५ मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास ओव्हरटाईम म्हणून ग्राह्य धरत पगाराच्या हिशोबाने अर्धा तासांचे वेतन दिले जाईल, अशाप्रकारे ओव्हरटाईम मिळणार आहे.

या नव्या कामगार नियमांनुसार, कोणताही कर्मचारी सलग ५ तासांपेक्षा जास्त वेळ काम करु शकत नाही. तसेच ५ तास काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना अर्धा तासांचा ब्रेक दिला जाईल. कर्मचाऱ्यांना कामातून पुरेशी विश्रांती मिळावी आणि कंपन्यांकडून त्यांच शोषण होऊ नये. या हेतूने कामगारांसाठी नवे नियम तयार करण्यात आले आहेत.

- Advertisement -

या नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच बेसिक पगाराचं प्रमाण ५० टक्के असेल तर उर्वरित ५० टक्के इतर भत्त्तांचा समावेश असेल. सध्या कंपनी बेसिक पगारात २५ ते ३० टक्केच रक्कम ठेवतात. त्यामुळे पगारातील ७० ते ७५ टक्के रक्कम इतर भत्त्यांमध्ये दाखवली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हातात मिळणारा पगार जास्त असतो. सध्या पीएफ हा बेसिक पगारावर मोजला जातो. त्यामुळे बेसिक पगारा एकूण पगाराच्या २५ ते ३० टक्के असल्याने पीएफची रक्कम कमी आहे. मात्र यापुढे बेसिक पगार वाढल्यास पीएफ जास्त कापला जाईल, त्यामुळे हातात येणारा पगार ७ ते १० टक्क्यांनी कमी होईल.


सक्तीचे धर्मपरिवर्तन रोखण्यासाठी ‘हा’ कायदा लागू, दंडासह भोगावा लागू शकतो तुरुंगवास


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -