Ladakh Border : चीनकडून ६० हजार सैन्य तैनात; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचा दावा

भारत आणि चीनमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. अशातच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीन क्वाड देशांसाठी (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान) धोका असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी चीनने लडाख सीमेवर तब्बल ६० हजार सैन्य तैनात केले असल्याचा दावा केला आहे. तसेच चीनविरोधातील लढाईत भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मंगळवारी टोकियोमध्ये बैठक पार पडली. कोरोनानंतर पहिल्यांदाच समोरासमोर पार पडलेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीतून परतल्यानंतर माइक पोम्पिओ यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी चीनकडून असणारे धोके तसेच नियमांचे उल्लंघन यावर भाष्य करताना लडाख सीमेचा उल्लेख केला.

काय म्हणाले पोम्पिओ 

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत मी होतो…चार सर्वात मोठ्या लोकशाही, चार शक्तिशाली अर्थव्यवस्था, चार देश…प्रत्येक देशाला चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून धोका आहे. याचा जाणीव त्यांना आपल्या देशातही होत आहे. प्रत्येकाला याची जाणीव आहे. मग ते भारतीय असोत ज्यांना हिमालयात सैन्यासोबत लढा द्यावा लागत आहे. चीनने लडाखमध्ये आता मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. चीनला रोखण्यासाठी क्वाड देश धोरण आखत असल्याची माहिती माइक पोम्पिओ यांनी दिली आहे. तसंच भारताला चीनविरोधात लढा देताना नक्कीच अमेरिकेची साथ मिळणं गरजेचं आहे.

हेही वाचा –

weather Alert: मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ‘या’ भागात देखील ऑरेंज अलर्ट