घरदेश-विदेशलालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण; तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये पाठवले

लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण; तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये पाठवले

Subscribe

चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी लालू प्रसाद यादव यांना बिर्सा मुंडा सेंट्रल जेलमधून उपचारासाठी राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पाठवण्यात आले.

चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आज रांचीच्या सीबीआय न्यायालयासमोर शरण आले. न्यायालयासमोर शरण आल्यानंतर आधी त्यांना बिर्सा मुंडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पाठवण्यात आले. मी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन केले आहे. माझी काहीच इच्छा नाही जिकडे ठेवायचे आहे तिकडे ठेवा, अशी प्रतिक्रिया लालू प्रसाद यादव यांनी शरण येण्यापूर्वी दिली.

- Advertisement -

तुरुंगातून हॉस्पिटलमद्ये दाखल

आज रांजी सीबीआय न्यायालयासमोर लालू प्रसाद यादव शरण आले. शरण आल्यानंतर कोर्टाने आधी त्यांची रवानगी बिर्सा मुंडा सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यांना राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. चारा घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्यानंतर २३ डिसेंबर २०१७ ला लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

- Advertisement -

जामीनाची विनंती कोर्टाने फेटाळली

लालू प्रसाद यादव १० मे पासून मुलगा तेजप्रताप यादव याच्या लग्नानिमित्त ते बाहेर होते. तसेच त्यांच्या प्रकृती बिघडल्यामुळे आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाची मुदत २० ऑगस्ट रोजीच संपली आहे. ही जामीनाची मुदत आणखी तीन महिने वाढवावी. अशी विनंती त्यांनी झारखंड न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावत त्यांना आज कोर्टासमोर शरण येण्यास सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -