घरक्राइमदिल्लीत वकिलाची गोळ्या झाडून हत्या; पोलीस आरोपीच्या शोधात

दिल्लीत वकिलाची गोळ्या झाडून हत्या; पोलीस आरोपीच्या शोधात

Subscribe

दिल्लीत दिवसाढवळ्या एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. वीरेंद्र असे या वकिलाचे नाव आहे. दिल्लीतील दक्षिण द्वारका भागात ही घटना घडली. जखमी वकिलाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

दिल्लीत दिवसाढवळ्या एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. वीरेंद्र असे या वकिलाचे नाव आहे. दिल्लीतील दक्षिण द्वारका भागात ही घटना घडली. जखमी वकिलाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस हल्लोखोराचा तपास करत आहेत. (Lawyer Shot Dead Publicly In Delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये सार्वजनिकस्थानी एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासानुसार हे संपूर्ण प्रकरण परस्पर वैमनस्यातून असल्याचे दिसते. मात्र, पोलिस या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. आरोपी दुचाकीवरून आल्याचे निष्पन्न झाले आहे. वीरेंद्रवर गोळीबार झाला तेव्हा ते त्यांच्या गाडीत होते.

याप्रकरणी पोलिसांनी पोलीस पथक घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात तैनात केले आहे. तसेच, आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. यासोबतच पोलीस घटनास्थळाजवळ राहणाऱ्या काही लोकांचीही चौकशी करत आहेत.

- Advertisement -

महिला बांधकाम व्यावसायिकावर हल्ला

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांवर सातत्याने हल्ले होत असताना आता एका महिला बांधकाम व्यावसायिकावर हल्ला झाला. पनवेल परिसरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर काल, मंगळवारी (२८ मार्च) रात्री उशिरा गोळीबार झाला. या घटनेत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर नेरुळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – गडचिरोलीतील अबुझमाड जंगलात पोलिसांची मोठी कारवाई; एका नक्षलवाद्याला कंठस्नान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -