घरक्राइमLiquor Policy Scam : अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या...

Liquor Policy Scam : अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात

Subscribe

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात हजर केले. ईडीने केजरीवालांची पुन्हा सात दिवसांची कोठडी मागितली. ईडीचे म्हणणे होते की केजरीवाल चौकशीत सहाकार्य करत नाहीत. आणखी एका आरोपीसोबत त्यांची समोरासमोर चौकशी करायची आहे.

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेबद्दल प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, मला अटक का करण्यात आली? माझ्या विरोधात कोणताही आरोप नाही. माझ्या अटकेसाठी यंत्रणेकडे कोणते पुरावे आहेत, ते त्यांनी सांगावे. कोणत्याही कोर्टाने मला दोषी ठरवलेले नाही. तरीही मला अटक का केली गेली? असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले. त्यानंतरही कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला नाही. कोर्टाने केजीरवाल यांच्या कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

- Advertisement -

का झाली केजरीवालांना अटक?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यात 21 मार्च रोजी अटक करण्यात आली. केजरीवाल यांना कोर्टाने सात दिवसांची कोठडी सुनावली होती. आज त्यांची कस्टडी संपत होती. ईडीने त्यांना आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू विशेष कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने पुन्हा सात दिवसांची कोठडी मागितली, मात्र कोर्टाने त्यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. आता एक एप्रिलपर्यंत केजरीवाल ईडी कोठडीत राहणार आहेत.

दिल्ली हायकोर्टाचा केजरीवालांना दिलासा

अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. न्यायलयाने म्हटले आहे की, राष्ट्रपती राजवटीचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही. हा अधिकार राष्ट्रपतींना आहे, राज्यपालांच्या शिफारशीने या संबंधीचा निर्णय होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा : Arvind Kejriwal : मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याची मागणी फेटाळली, दिल्ली हायकोर्टाचा केजरीवालांना दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -