घरमनोरंजन‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ऑस्ट्रेलियात ‘नाच गं घुमा’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ऑस्ट्रेलियात ‘नाच गं घुमा’

Subscribe

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. यातील विनोदवीरांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. केवळ भारतातच नाही तर परदेशातही हास्यजत्रेच्या विनोदवीरांची प्रचंड लोकप्रियता आहे. याआधीही हास्यजत्रेची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर गेली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. एका नव्या गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील अभिनेत्रींनी व्हिडीओ केला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं जे सध्या युट्यूब म्युझिकवर ट्रेडिंग होतं आहे. या गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींनी व्हिडीओ केला आहे.

“आम्ही बाई घुमा आम्ही बाई घुमा…ऑस्ट्रेलियात वेगवेगळे कपडे घालून घुमा (यमक जुळवण्याच्या धडपडीसाठी माफ करा),” असं कॅप्शन लिहित नम्रता संभेरावने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “क्या बात है.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लेडीज गँग जिंदाबाद.” तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप छान.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरे एकदम कडक.”

- Advertisement -

 ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट 1 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हे गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतने गायलं आहे. तसंच हे गाणं परेश मोकाक्षी यांनी लिहिलं आहे. याशिवाय या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनाची भूमिका राहुल ठोंबरेने सांभाळली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. आजवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता परदेशात लाइव्ह परफॉर्म करत हे विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -