घरताज्या घडामोडीVBA vs MVA : ज्यांना सोबत यायचं आहे ते...; वंचितच्या निर्णयावर आदित्य...

VBA vs MVA : ज्यांना सोबत यायचं आहे ते…; वंचितच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. देशात एकूण सात टप्प्यात तर, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदारप्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या जात आहेत. परंतू, राज्यातील महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांमध्येही अद्याप जागावाटपावरून तिढा कायम आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. देशात एकूण सात टप्प्यात तर, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदारप्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या जात आहेत. परंतू, राज्यातील महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांमध्येही अद्याप जागावाटपावरून तिढा कायम आहे. अशातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जागावाटपात योग्य मान मिळत नसल्याने वेगळी चूल मांडत प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारही जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव नाकारत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारही जाहीर केले असून, ते स्वत: अकोल्यातून निवडणूक लढणार आहेत. परंतू, प्रकाश आंबेडकर हे मविआतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. (VBA vs MVA aditya thackeray reaction on prakash ambedkar vba loksaba 2024 candidate)

- Advertisement -

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “आम्ही संविधानासाठी, महाराष्ट्रासाठी लढत आहे. ज्यांना सोबत यायचं आहे ते येऊ शकतात”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (27 मार्च) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी जाहीर केले आहेत.

- Advertisement -

वंचितची उमेदवारी यादी जाहीर

  • भंडारा-गोंदिया- संजय गजानन केवट
  • गडचिरोली- चिमूर- हितेश पांडूरंग मडावी
  • चंद्रपूर- राजेश वारलूजी बेले
  • बुलढाणा- वसंत मगर
  • अकोला- प्रकाश आंबेडकर
  • वर्धा- राजेंद्र साळुंखे
  • अमरावती- प्राजक्ता पिल्लेवान
  • यवतमाळ-वाशिम- खेमसिंग पवार

हेही वाचा – Liquor Policy Scam : अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -