घरताज्या घडामोडीLive Update: आज दुसऱ्या दिवशी कांद्याच्या दरात घसरण

Live Update: आज दुसऱ्या दिवशी कांद्याच्या दरात घसरण

Subscribe

मनमाड – कांद्याच्या दरात घसरण अजूनही सुरुच आहे. आज दुसऱ्या दिवशी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. आज कांद्याला ५३ हजार तर सरकारी ४८ हजार इतका भाव झाला आहे. कालचा कांद्याचा भावा ५४ हजार तर सरासरी ४९ हजार इतका होता. कालच्या तुलनेत आज १०० रुपयांची घसरण झाली आहे.


११वीचे ऑनलाईन वर्ग २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. प्रवेश घेतला असो वा नसो हजेरी लावता येणार आहे. हा ऑनलाईन वर्ग दररोज ३ तास चालणार आहे, असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.

- Advertisement -

बृहन्मुंबई महापालिकेने २० एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान मास्क न घालणाऱ्यांकडून ३.५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत ४८ हजार २६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाक ३७ हजार ११९वर पोहोचला आहे. यापैकी १ लाख २१ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ५९ हजार ४५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशातील ७४ लाख ३२ हजार ८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५ लाख ८२ हजार ६४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४५वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना श्रद्धांजली वाहली.


राज्यात शुक्रवारी ६ हजार १९० नव्या कोरोनाबाधित वाढ झाली असून १२७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७२ हजार ८५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -