Live Update : अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात एसी बसला भीषण आग

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात एसी बसला भीषण आग


चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल

चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रॅली


व्हीप काढणार नाही, शिंदे गटाचे सर्वोच्च न्यायालयात आश्वासन

सर्वोच्च न्यायालयाची दोन्ही गटाला नोटील, २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश

ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयातच ऐकणार – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी सुरु

तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होतेय सुनावणी

आयोगाच्या निर्णयाच सिब्बल यांच्याकडून वाचन सुरु

आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची ठाकरे गटाच्या वकिलांची मागणी

तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकत नाही : शिवसेना

सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करू नये : शिवसेना गटाचे वकील कौल

निवडणूक आयोगाकडून मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरु

ठाकरेंची याचिका फेटाळून लावा : मनिंदर सिंह


उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेची नेमणूक केली- सिब्बल

एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणीत चौथ्या क्रमांकाचे नेते- कपिल सिब्बल

काहींची नेमणूक केली, तर काही निवडून आले- सिब्बल

व्हीपचा निर्णय पक्ष घेत असतो- सिब्बल

पक्षाचे सर्व निर्णय ठाकरे घेत होते- सिब्बल

कागदपत्रावरून तर तसं दिसत नाही- सरन्यायाधीश

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

कपिल सिब्बलांकडून शिवसेनेच्या आधीच्या कार्यकारिणीचं वाचन

एकनाथ शिंदे यांची २०१८ साली नेतेपदी नियुक्ती- कपिल सिब्बल

मुख्य प्रतोद यांची निवड कशी होते? याचे सरन्यायाधीशांकडून मराठीमध्ये वाचन

आमदारांनीच सर्व अधिकार ठाकरेंना दिले होते : सरन्यायाधीश

बंडानंतर शिंदेंची गटनेता पदावरून हकालपट्टी : कपिल सिब्बल

शिंदे गटाने पक्षाच्या लेटर हेडचा गैरवापर केला : कपिल सिब्बल

सभागृहातील सर्व आमदार पक्षाचा आवाज असतात : कपिल सिब्बल

कोणाचा व्हीप योग्य, कोणाचा व्हीप अयोग्य यावर युक्तिवाद सुरु

तुम्ही सात जणांच्या घटनापीठाकडे रेबिया केस कधी पाठवता? : कपिल सिब्बल

२९ जूनला सांगितल्याप्रमाणे जुनं सरकार परत आणा : सिब्बल

बहुमत चाचणीपुरतेच अंतरिम आदेश दिले होते : सरन्यायाधीश

ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अंतरिम आदेश पुढे लागू होत नाही : सरन्यायाधीश

कोर्टाने सर्व बाबींचा विचार न केल्याने हे सर्व काही झालं : कपिल सिब्बल

आम्ही अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणार नाही : सरन्यायाधीश

आम्हीच खरा पक्ष हा शिंदेंचा युक्तिवाद अयोग्य : कपिल सिब्बल

व्हीप हा फक्त राजकीय पक्ष जारी करतो, विधीमंडळ पक्ष नाही : सिब्बल

पक्षविरोधी मतदान म्हणजे पक्षाशी बेईमानी : सिब्बल

आसाममध्ये जाऊन सरकार पाडता हे किती योग्य : सिब्बल

विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोदांना आव्हान देऊ शकत नाही : सिब्बल

राज्यपालांनी घटनेच्या तत्वाचे पालन केले नाही : सिब्बल


दिल्ली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाचा ताबा

आपच्या शेली ओबेरॉय यांनी जिंकली महापौर पदाची निवडणूक

शेली ओबेरॉय यांना 150 तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना 116 मते मिळाली


राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

गुढीपाडवा, आंबेडकर जयंती निमित्त १०० रूपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय

१ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा

नाव, चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक

——————————————————

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित

आजच्या बैठकीत नोकर भरतीबाबत आढावा घेतला जाणार


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस

सुनावणीच्या पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे वकील यांनी युक्तिवाद केला

कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या वेळी सरन्यायाधिशांसमोर मांडले अनेक प्रश्न

आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल करणार युक्तिवाद


ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर होणार सुनावणी

आज दुपारी ३.३० वाजता सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने ठाकरे गटाने दाखल केली याचिका

आयोगाने चुकीचा निर्णय दिला, असे ठाकरे गटाने सांगितले आहे


स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज राज्यभर आंदोलन


कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकींमध्ये प्रचाराचा धडाका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कसबा पेठ येथे घेणार प्रचार सभा

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार निवडणुकीच्या मैदानात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही करणार भाजपच्या उमेदवारसांसाठी रोड शो


मुंबईतील धारावी झोपडपट्टीमधील कमला नगर येथील घरांना लागली आग

पहाटे ४ वाजता लागली होती आग

आगीमध्ये २५ पेक्षा अधिक घरे जळून राख

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण


दिल्लीला मिळणार नवीन महापौर

आपच्या शेली ओबेरॉय आणि भाजपच्या रेखा गुप्ता यांच्यामध्ये होणार निवडणूक