घरअर्थजगत10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमी अन् प्रक्रिया शुल्कशिवाय मिळणार, पण कसे?

10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमी अन् प्रक्रिया शुल्कशिवाय मिळणार, पण कसे?

Subscribe

कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतो. याशिवाय जर एखादा विद्यमान व्यापारी किंवा दुकानदार आपला विद्यमान व्यवसाय पुढे नेऊ इच्छित असेल आणि त्यासाठी पैशांची गरज असेल, तर तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतो.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) चे उद्दिष्ट स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज प्रदान करणे आहे. हे कर्ज तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आधीच चालू असलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी घेतले जाऊ शकते. हे कर्ज हमीशिवाय उपलब्ध आहे आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक अशी योजना आहे, ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्यांचा चालू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा आहे, अशा लोकांना त्याचा लाभ घेता येईल. मुद्रा योजनेचा उद्देश स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज देणे आणि लघु उद्योगांद्वारे रोजगार निर्मिती करणे हा आहे. PMMY एप्रिल 2015 मध्ये सुरू झाले.

- Advertisement -

कोण कर्ज घेऊ शकतो?

कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतो. याशिवाय जर एखादा विद्यमान व्यापारी किंवा दुकानदार आपला विद्यमान व्यवसाय पुढे नेऊ इच्छित असेल आणि त्यासाठी पैशांची गरज असेल, तर तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतो.

मुद्रा कर्जाचे तीन प्रकार

शिशू कर्ज: शिशू कर्जा अंतर्गत अर्जदार 50,000/- रुपये घेऊ शकतात. हे कर्ज अशा लोकांसाठी आहे जे नुकतेच त्यांचा व्यवसाय सुरू करत आहेत.

- Advertisement -

किशोर कर्ज: किशोर कर्ज 50,000 रुपयांपासून पाच लाखांपर्यंत आहे. हे कर्ज अशा अर्जदारांसाठी योग्य आहे ज्यांनी आधीच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे, परंतु सेट करण्यासाठी आणखी काही पैशांची आवश्यकता आहे.

तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत, अर्जदार 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता हे अशा लोकांना दिले जाते ज्यांचे व्यवसाय स्थापित आहेत परंतु त्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता आहे.

मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply For Mudra Loan)

मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY), मुद्रा कर्ज जवळजवळ सर्व सरकारी आणि खासगी बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे दिले जातात. ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे, त्या बँकेतून मुद्रा कर्जाचा फॉर्म डाऊनलोड केला जाऊ शकतो. त्यानंतर ते भरून बँकेत जमा करावे लागते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घराच्या मालकीची किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन क्रमांकासह इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील. जर सध्याचा व्यवसाय असेल आणि त्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती देखील विचारू शकते.


हेही वाचाः विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कठोर नियमावली करणार- उदय सामंत

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -