घरमहाराष्ट्रनाशिकविहिरीत विष टाकून कुटूंब संपवण्याचा प्रयत्न

विहिरीत विष टाकून कुटूंब संपवण्याचा प्रयत्न

Subscribe

नांदगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच साकोरा येथे अज्ञात व्यक्तीने एका खासगी विहिरीत विषारी औषध टाकून कुटूंब संपवण्याचा प्रयत्न केल्याची बाब शुक्रवारी, १० मे रोजी सकाळी पाणी उपशानंतर निदर्शनास आली.

नांदगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच साकोरा येथे अज्ञात व्यक्तीने एका खासगी विहिरीत विषारी औषध टाकून कुटूंब संपवण्याचा प्रयत्न केल्याची बाब शुक्रवारी, १० मे रोजी सकाळी पाणी उपशानंतर निदर्शनास आली. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरुध्द नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

साकोरा परिसरात यावर्षी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. काही खासगी विहिरीत थोड्या फार प्रमाणात पाणी असून, त्या पाण्यावर अनेक कुटूंबाची तहान भागत आहे. पूर्वेकडील पांढरी शिवारात कल्याबाई शांताराम बोरसे यांच्या विहिरी असून, या विहिरीतून दररोज सकाळी त्यांचे पती शांताराम बोरसे बैलगाडीतून जनावरांसाठी तसेच घरासाठी पाणी आणून तहान भागवत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते या विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी गेले असता, वीजपंप चालू करुन दोन पाण्याच्या टाक्या बैलगाडीतून घरी आणल्या. मात्र, घरी येताना त्या पाण्याला दुर्गंधी सुटल्याचे आणि फेस आल्याने त्यांना संशय आला. बोरसे यांनी ते पाणी टाकून दिले आणि याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी बी.बी. सरोदे, तलाठी कपिल मुत्तेपवार, पोलीसपाटील बाबासाहेब बोरसे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, संदीप बोरसे, माजी सरपंच आर. झेड. बोरसे, देवदत्त सोनवणे, तात्यासाहेब बोरसे, तेजूल बोरसे आदिंनी विहिरीवर जाऊन पाहणी केली. यावेळी अज्ञाताने विहिरीत विषारी औषध टाकून औषधाचे रिकामे डबेही विहिरीतच टाकल्याचे आढळले. यामुळे विहिरीतील जिवजंतू मृत झाल्याचेही दिसून आले. त्याबाबत गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांना कळवले आहे. पोलिसांनीही घटनास्थळी पंचनामा करुन पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -